फिल्मी न्यूज – 19-01-2013

सनी च्या चित्रपटात सनी लियोनचा आयटम नंबर

सनी लियोन बेचारी सांगून सांगून थकून गेली आहे की ती कुठल्याही चित्रपटात आयटम सांग करत नाही आहे आणि संपूर्ण लक्ष सध्या ‘रागिनी एमएमएस 2’वर आहे ज्याची ती शूटिंग करत आहे. अनिल शर्मा हे सनी देओलला घेऊन चित्रपट ‘सिंह साहब द ग्रेट’ तयार करत आहे आणि त्यांनी एका आयटम सांगसाठी सनी लियोनशी संपर्क साधला होता, पण ते काही शक्य झालेले नाही, याचे मुख्य कारण म्हणजे सनीने त्या आयटम साँगची एवढी मोठी रक्कम मागितली की अनिलने सनी लियोनला या साँगसाठी घेण्याचे मनातून काढून टाकले आहे.मध्य प्रदेशात सिंह साहब द ग्रेटची शूटिंग सुरू होणार असून या वर्षात ते चित्रपट रिलीज होईल. सध्या अनिल शर्मा एका अशा चेहर्‍याच्या शोधात आहे जो त्यांच्या चित्रपटात सेक्सी आइटम साँग करू शकेल.



कैटरिना-अक्षय कुमार पुन्हा एकत्र

नमस्ते लंदन, वेलकम आणि सिंह इज किंग सारखे सफल चित्रपट अक्षय कुमार आणि कॅटरीनाच्या जोडीने दिले होते. तीस मार खां आणि दे दना दनचा परिणाम जेव्हा बॉक्स ऑफिसवर चांगला नाही पडला तेव्हा अक्षय आणि कॅटरीनाने आपल्या जोडीला काही दिवस ब्रेक दिला. त्यांना वाटले की सारखे सारखे त्यांची जोडी बघून प्रेक्षकांना आता एवढा इंटरेस्ट राहिलेला नाही. किमान अडीच वर्षांनंतर दोघेही परत एकत्र काम करीत आहे. ‘राउडी राठौर’च्या माध्यमाने यश मिळवून चुकले संजय लीला भंसाली एकदा परत साऊथचा रीमेक बनवत आहे. याचे निदर्शन दक्षिण भारतीय दिग्दर्शक एम. राजा करणार आहेत.



तब्बू रेड कार्पेट वर

बॉलिवूडमधील अभिनेत्री तब्बू आणि नवोदित अभिनेता सूरज शर्मा यांनी आंग ली यांच्या 'लाईफ ऑफ पाय' या चित्रपटासाठी ७० व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात सहभाग घेतला. 'लाईफ ऑफ पाय' या चित्रपटाला तीन श्रेणंमध्ये नामांकन मिळाले होते. आपल्या सहज अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या तब्बूने पुरस्कार सोहळ्याच्या वेळी लाल रंगाची साडी परिधान केली होती. तर सूरज काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसला.



अक्षय कुमार बनला गायक

आजपर्यंत कुंदनलाल सैगल यांच्यापासून ते अमिताभ बच्चन, गोविंदापर्यंत अनेक हिरोंनी स्वत:ची गाणी स्वत:च गायिली आहेत. अर्थात सैगल किंवा किशोरकुमारसारखे अभिनेते हे उत्तम गायक होते, मात्र अनके अभिनेत्यांनी केवळ एक वेगळेपण, हौस म्हणून गाणी गायिली. आता अशा अभिनेत्यांच्या पंक्तीत अक्षयकुमारही जाऊन बला आहे. त्याने 'स्पेशल छब्बीस' या आगामी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. त्याचे हे गाणे एक सॉफ्ट रोमंटिक गाणे आहे. 'मुझमें तू है' असे या गाण्याचे बोल आहेत. एम.एम. करीम हे या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आहेत. सुरुवातीला अक्षय गाणे गाण्यासाठी तयार नव्हता. एक महिनाभर प्रयत्न करून त्याचे मन वळवण्यात आले आणि त्याने आपल्या बसक्या आजवात गाणे गाण्याचे धाडक केले! त्यापूर्वी त्याने संगीताची जुजबी माहितीही करून घेतली. पाच महिने तयारी केल्यावर मग त्याने गाणे गाण्यासाठी तोंड उघडले, मात्र त्याची ही मेहनत चांगलीच फळाला आल्याचे म्हटले जाते. हे गाणे चांगले झाले असल्याची चर्चा आहे. आता संजय दत्त 'ए शिवानी' करू शकतो किंवा आमीर खान 'आती क्या खंडाला' करू शकतो तर अक्षय कुमार 'मुझमें तू है' का करू शकणार नाही? कदाचित त्याला 'कोलावरी डी' सारखी लोकप्रियता मिळेल!

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA