आई तुझा आशिर्वाद या चित्रपटाच्या गीतध्वनी मुद्रण

लिजंड मुवीज इंटरनेशनल या बैनरखाली शारंगदेव व जीत सिंग निर्मित व मधुरा पंडित जसराज दिग्दर्शित आई तुझा आशिर्वाद या चित्रपटाची सुरुवात गीतध्वनिमुद्रणाने स्वरलता स्टुडियो मध्ये गानकोकिऴा भारतरत्न लता मंगेशकर व संगीत मार्तंड पदमविभूषण पंडित जसराज यांनी गायलेल्या गीताने झाली. पहिल्यांदाच मराठी चित्रपटात लता मंगेशकर आणि पंडित जसराज यांनी एकत्रितपणे गीत गायले आहे. या चित्रपटातील इतर गाणी सुपरिचित गायक सुरेश वाडकर, इश्वरी पंडित तसेच जितेंद्र जोशी यांनी गायली आहेत. संगीतकार मयुरेश पै आहेत.
अरूण नलावडे, मिलिंद गवळी, दुर्गा पंडित जसराज, शरद पोंक्षे, दिपाली पानसरे, विमल म्हात्रे, विद्या पटवर्धन, रेखा बडे, कमलाकांत सुर्वे, प्रसाद दाणी व इतर कलाकार आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त कोल्हापूर येथे ४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता महालक्ष्मी मंदिरात झाला. या मंदिरातून चित्रपटाचे चित्रिकरण सुरु झाले आहे.

-- अश्विनी पब्लिसिटी

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर