Director ने कशी दिली झोपायची offer...

फिल्म इंडस्ट्री आपल्याला झगमगीत जादूची दुनिया वाटते. पण तिचे खर रूप आपल्याला माहीत नसते. पण त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असलेल्या लोकांना मात्र त्या इंडस्ट्रीतील सगळ्या गोष्टी माहिती असतात.

असे म्हणतात अभिनेत्रींना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग कावूचसारख्या गोष्टी घडत असतात.

हैरॅसमेंट आणि कास्टिंग काउचचे अनेक प्रकरण रोज समोर येत असतात. पण त्यावर खुप कमी लोक बोलत असतात. अशीच एक घटना मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे सोबत घडली होती.

त्यावेळी श्रुती गप्प बसली नाही. तिने त्यावर सडेतोड उत्तर दिले. श्रुतीने ह्यूमन ऑफ बॉम्बे नावाच्या अधिकृत इन्स्टा पेजवर ऑडिशनच्या वेळी निर्मात्याद्वारे तिच्याबरोबर घडलेली एक घटना सर्वांसमोर आणली.

श्रुती ने सांगितले की, तिच्या ऑडिशन ची सुरुवात अगदी साधारण पद्धतीने झाली होती. मात्र नंतर हळूहळू तिला काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले.

त्यावेळी तिला समझोता आणि वन नाईट स्टॅन्ड या शब्दांचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र समोरील व्यक्तीच्या उद्देश काय आहे. हे ओळखण्यास श्रुतीला वेळ लागला नाही.

त्यामुळे लगेचच तिने त्या निर्मात्याला सडेतोड उत्तर दिले. ती म्हणाली की, ‘मी तुमच्यासोबत झोपावे अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही या चित्रपटाच्या हिरोला कोणा सोबत झोपायला सांगणार आहात ?

श्रुतीचे हे प्रत्युत्तर ऐकून त्या निर्मात्याच्या चेहऱ्यावरील रंग उडाले. श्रुती पुढे म्हणाली की, ‘तुमच्याकडे असे प्रोजेक्ट आले असतील तर ते वेळीच सोडून टाका. कारण दर वेळी आपण गप्प बसून आपलेच नुकसान करत असतो.’
श्रुती पुढे म्हणाली की, माझ्या मते जर कधी एखाद्या महिलेच्या बाबतीत काही चुकीचे घडत असेल किंवा तसा घडवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्या महिलेने त्या वेळी योग्य ते प्रतिउत्तर दिले पाहिजे. जेणेकरून ती व्यक्ती इतर दुसऱ्या मुलीसोबत अशी हरकत करू नये.

जर त्यावेळी त्या महिलेने तसे केले नाही तर त्या व्यक्तीची हिंमत अजून वाढेल. अशाने तो इतर महिलांना सुद्धा त्याची शि का र होण्यास प्रवृत्त करेल. त्यामुळे माझे म्हणणे आहे की कास्टिंग काऊच किंवा हरॅसमेंट यांसारख्या प्रकरणाच्या शिकार झालेल्या महिलेने मी टूसारख्या आंदोलनाचे वाट पाहत बसू नये. असे तिने सांगितले.

या पोस्टमध्ये श्रुतीने ती कुठल्या चित्रपटाचे ऑडिशन देण्यास गेली होती किंवा त्या निर्मात्याचे नाव सांगितले नाही. वेडिंग एनिवर्सरी आणि बुधिया सिंह, बॉर्न टू रन यांसारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर