हिंदी चित्रपट ‘3 देव’ च्या पोस्टरचे अनावरण
करण सिंग ग्रोव्हर, रवि दुबे आणि कुणाल रॉय कपूर आपल्या आगामी चित्रपटात भगवान विष्णु, भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव ची भूमिका साकारली आहे, ‘3 देव’ 11 मे, 2018 रोजी सर्वत्र रिलीज होईल. त्याचबरोबर हया चित्रपटात के के मेनन, टिस्का चोप्रा, राइमा सेन, पूनम कौर, प्रिया बॅनर्जी आणि प्रोसेनोदजित यांचाही समावेश आहे. चित्रपटाची टॅगलाइन आहे 'अंडरकवर भगवान'. कदाचित भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि भगवान शिव पृथ्वीच्या फेरफटक्यासाठी मानवाचा अवतार घेतील. चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश भट्ट यांनी केले असून त्यांनी ‘भिंडी बाजार’ आणि ‘मुंबई मिरर’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. अंकुश भट्ट म्हणाले, "चित्रपटात एक वास्तववादी विनोद आहे, जो आपल्या जीवनामध्ये देव का आवश्यक आहे याबद्दल बोलतो. तो ईश्वराची ओळख काय आहे, आणि तो आशा आणि विश्वासाचा पर्याय आहे असे विचारत आहे. आज, लोक फक्त गरजेच्या वेळी देवाची आठवण काढतात. बुम्बडा ने हया चित्रपटाक सूत्रधाराची भूमिका साकारली आहे." ट्विटर वर वरुण धवन यांनी पोस्टचे अनावरण केले आहे. ह्या ट्विट मध्ये असे लिहिले आहे की, "# 3 देव येथे आहेत, ख...