मराठी सिनेमाचे अनुदान बंद झाले पाहिजे
मुंबई –' मराठी चित्रपटांचे कौतुक होत असले तरी सध्या मराठी चित्रपटसृष्टीची स्थिती फारच वाईट झाली आहे. ही स्थिती सुधारायची असेल , तर सरकारने अनुदान देणे बंद केले पाहिजे. त्या अनुदानामुळेच भारंभार निर्मिती होत आहे. अनुदान बंद करून राज्यभरात चित्रपटगृहे उभारल्यास चित्रपटसृष्टीचे कल्याण होईल ,' असे मत निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ' मराठी चित्रपट : एक आत्मशोध ' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे , ' सिटीप्राइड ' चे अरविंद चाफळकर , पत्रकार अमोल परचुरे , दिग्दर्शक रवी जाधव , महाराष्ट्र राज्य रंगभूमी , चित्रपट विकास महामंडळाचे लक्ष्मीकांत देशमुख , ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल , ' प्रभात ' चे विवेक दामले , ' झी मराठी ' चे श्याम मळेकर यांनी सहभाग घेतला होता. मराठी चित्रपटसृष्टीच्या सध्याच्या परिस्थितीवर या परिसंवादात वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अशा चर्चा अनेकवेळा झाल्या असून , त्यांची प्रत्यक्षातील अंमलबजावण...