स्पृहा "मीडियम स्पाइसी"मध्ये एका वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत

शंकर मराठे - मुंबई  ६ जून २०२२ -  "मीडियम स्पाइसीचित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर जाहीर केल्याप्रमाणे स्पृहा जोशीच्या अभिनयाचा फ्लेवर रसिकांना या चित्रपटातून अनुभवता येणार आहेआशयघन चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी नव्या पिढीतील एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे स्पृहा जोशीचित्रपटरंगभूमी आणि टेलिव्हिजनवर लीलया वावरणारी  अभिनयाबरोबरच लेखनसूत्रसंचालनकविता या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करणारी स्पृहा "मीडियम स्पाइसी"मध्ये कृष्णा नावाच्या एका छोट्याशापण वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत दिसणार आहेकृष्णा नक्की कोण आहेयाचा अजून खुलासा झालेला नसला तरी जेवणाच्या थाळीत विविध फ्लेवर्स असल्यावर जसे जेवण परिपूर्ण होते तसेच स्पृहा जोशीच्या कृष्णा या पात्राच्या फ्लेवरमुळे "मीडियम स्पाइसीचित्रपटातील पात्रांच्या विविध फ्लेवर्सने सजलेली लज्जतदार थाळी परिपूर्ण होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर