आचार्य रत्नसुंदरसूरीश्वरजी महाराज सुरीजी यांचा आर्शीवाद घेण्यासाठी दिवाकर रावते, अजय चौधरी, गीता जैन आणि हर्षवर्धन पाटील साहित्य सत्कार सोहळा, यात्रा ३०० सायन स्थित सोमैया ग्राऊन्ड वर आले



मुंबई, ८ जानेवारी, २०१६ - आचार्य रत्नसुंदरसूरीश्वरजी महाराज सुरीजी यांचा आर्शीवाद घेण्यासाठी दिवाकर रावते, अजय चौधरी, गीता जैन आणि हर्षवर्धन पाटील साहित्य सत्कार सोहळा, यात्रा ३०० सायन स्थित सोमैया ग्राऊन्ड वर आले होते. आज साहित्य सत्कार सोहळ्याचा आठवा दिवस होता आणि आज वूमन डे साजरा केला गया. ह्यावेळी ५० हजार महिला आचार्य जी चा आर्शीवाद घेण्यासाठी आल्या होत्या. हा नजराना बघण्याजोगा होता.

नात्यांचे कोर्ट ह्या कार्यक्रमात निर्णायत स्थानावर विराजमान जैनाचार्य परमपूज्य रत्नसुंदरसूरीश्वरजी यांनी परिवारव्यवस्थेचा खांबा मजबूत पणे उभा रहावा, ह्यासाठी तीन उपाय सांगितले, ते केल्याने संपत्तिच्या क्षेत्रात पुढे जावे – १ शारीरिक स्वस्थता २. मनाची प्रसन्नता ३. परिवाराचे प्रेम. आचार्यश्री ने सांगितले कि मुलाला एवढे लायक बनवू लगा कि तो तुम्हाला नालायक समजू लागेल.
दुपारी फाइव स्टार ऑफ वूमन हार्ट ह्या विषयावर ५०,००० पेक्षा अधिक महिलांना संबोधित करताना म्हणाले कि स्त्रीला डब्ल्यू म्हणजे वॉटर (water) सारखा समर्पणभाव आत्मसात केला पाहिजे. ओ म्हणजे आइन्टमेन्ट (Ointment) सारखा अर्थात काळजाच्या जखमेवर मलम लावायचे काम केले पाहिजे. एम म्हणजे मीरर आत्मनिरीक्षण केले पाहिजे. ए म्हणजे अलार्रम (Alarm) कुंटुंबातील कोणी वाईट मार्गाला जात असेल तर त्याला थांबविले पाहिजे आणि एन म्हणजे निडल (Niddle) सर्वांना जोडण्याचे काम केले पाहिजे, तेव्हा तुमचे स्त्रीत्व सफल होईल.

परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले कि आचार्य जी च्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आहे. आज महिला दिवसामुळे एवढ़या महिला आचार्य जी दर्शन घेण्यासाठी आल्या आहेत, ह्यावरूच मुंबईवाशियांचा उत्साह दिसून येत आहे. नाती कशी अससी ? ह्या बद्दल आचार्य जी यांनी फारच सोप्या शब्दात सांगितले आहे. भारत देश हा साधु-संताचा आणि महात्म्यांचे राष्ट्र आहे.

अजय चौधरी यांनी सांगितले कि आचार्य जी चा आर्शीवाद प्राप्त होऊन जीवन धन्य झाले आहे. साहित्य सत्कार सोहळ्यात युवा आणि महिला वर्गाला खास करुन मार्गदर्शन केले आहे. हीच सर्वात मोठी समाजसेवा आहे.

गीता जैन (मेयर, मीरा-भाईंदर) म्हणाली कि हे फारच सुंदर व मनमोहक आयोजन आहे, त्यामुळेच ख-या अर्थाने समाजसेवा संपन्न झाली आहे. समाजासाठी फार मोठे कार्य झाले आहे. आचार्य जी च्या वाणीचा लाभ सर्वाना मिळाला आहे. त्यांचा आर्शीवाद आणि ज्ञान नेहमीच मिळत राहणार आहे, त्यांच्याकडे ज्ञानाचे अनमोल भंडार आहे. त्यामुळेच प्रत्येकाचे जीवन निश्चित बदलेल, कारण त्यांच्या वाणी मध्ये मधूरपणा आहे.

हर्षवर्धन पाटील (सायन्स एंड हेल्थ मंत्री) यांनी सांगितले कि हा अदभूत साहित्य सत्कार सोहळा आहे, त्यामध्ये सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. महिला दिवस साजरा केला आहे आणि ह्या उत्सवाला एवढ्या महिलांचा प्रतिसाद पहावयास मिळाला आहे. आजच्या आधुनिक युगात आचार्य जी च्या वाणीचा समाजा वर निश्चित सकारात्मक असर पडेल. मुंबईनगरीत अशा प्रकारचे धार्मिक आणि आध्यात्मिक आयोजन संपन्न झाल्यामुळे निश्चित पणे ह्याचा फायदा मुंबईकरांना मिळाला आहे, ह्यामध्ये कोणतीही शंका नाही.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर