आचार्य रत्नसुंदरसूरीश्वरजी महाराज सुरीजी यांचा आर्शीवाद घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई ची मेयर स्नेहल आंबेकर साहित्य सत्कार सोहळा, यात्रा ३०० सायन स्थित सोमैया ग्राऊन्ड वर आले
मुंबई,
५ जानेवारी, २०१६ - आचार्य रत्नसुंदरसूरीश्वरजी
महाराज सुरीजी यांचा आर्शीवाद घेण्यासाठी महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई ची मेयर स्नेहल आंबेकर
साहित्य सत्कार सोहळा, यात्रा ३०० सायन स्थित सोमैया ग्राऊन्ड वर आले
होते. ह्या वेळी मुख्यमंत्र्याच्या हस्ते महाराष्ट्रातील
गोशाळांना जीवद्या निमित ७६ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस म्हणाले कि परमपूज्य आचार्य जी च्या साहित्य सत्कार सोहळ्यात त्यांचे
दर्शन व आर्शीवाद प्राप्त करण्यासाठी उपस्थित राहणे हीच भाग्याची बाब आहे. ह्या क्षणी
मी लहान शब्दात संदेश देऊ इच्छितो कि आचार्य रत्नसुंदरसूरीश्वरजी
महाराज सुरीजी यांना राष्ट्रीय संत बोलणे उचित ठरेल. युवांना प्रेरित केले आणि युवा
पिढीला मार्गदर्शन केले. आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून जीवनाला सोप्या प्रकारे जगण्याचा
मार्ग दाखविला आहे. भौतिक संपत्ति च्या पुढे
आध्यात्मिक संपत्ती आहे, हे त्यांच्या विचारांतून
समजले. पूज्य संताचे विचार व आचार ऐकण्याची सुर्वण योग प्राप्त झाला आहे. दूधात साखर
घातली व दूध गोड झाले, ह्या प्रमाणेच महाराष्ट्र राज्याचा विकास
झाला पाहिजे. जेव्हा मी औरंगाबाद मध्ये आचार्यजी यांना भेटलो होतो. तेव्हा त्यांनी
गोवंश हत्याबंदी बद्दल सांगितले होते आणि त्यानुसार गाईना सुरक्षा दिली पाहिजे. त्याच
बरोबर त्यांचे लालन-पोषण देखील झाले पाहिजे. मराठवाड्यात दुष्काळ पडला आहे आणि गोवंश
वाचविण्याचा प्रयत्नात नेहमीच जैन समाज पुढाकार घेत आलेला आहे आणि एक वेळ पुन्हा जैन
समाज पुढे आला आहे. राज्य सरकार आणि जैन समाजाला मिळून प्रयत्न केले पाहिजे, नक्कीच स्वप्ने साकार होतील. ह्या भव्य-दिव्य कार्यक्रमासाठी येण्याची सुवर्णसंधी
मिळाली, ह्याबद्दल आभार प्रकट करतो.
मुंबई ची मेयर स्नेहल आंबेकर म्हणाल्या
कि मुंबई नगरीत ह्या प्रकारचे धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन होणे, हे मुंबईवाशियांसाठी अभिमानाची व गर्वाची बाब आहे.
हिंदू धर्मात जैन समाजाचे मोलाचे योगदान आहे.
Comments