साहित्य सत्कार सोहळा, यात्रा ३०० मध्ये मागील ६ दिवसात 3 लाख भाविक पोहचले
मुंबई, ७ जानेवारी, २०१६ - आचार्य रत्नसुंदरसूरीश्वरजी महाराज यांचा आर्शीवाद घेण्यासाठी साहित्य सत्कार सोहळा, यात्रा ३०० सायन स्थित सोमैया ग्राऊन्ड वर मागील ६ दिवसात 3 लाख भाविक पोहचले.
ह्या सोहळ्यात
विज्ञान आणि साहित्य विषयी चर्चा करण्यात आली. तरुण पिढी ने अति उत्साहा ने
पुढाकार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील
गोशाळांना जीवद्या निमित ७६ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. गोहत्याचा बचाव
करण्यासाठी दिलीप बाबा ने २०० गाईना जीवदान दिले आणि अकोल्यात ८ बैल दान केले.
मागील सहा दिवसात आचार्य रत्नसुंदरसूरीश्वरजी
महाराज चा आर्शीवाद घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री,
महाराष्ट्र), रमण सिंह
(मुख्यमंत्री, छत्तीसगढ़),
मोहन भागवत (प्रमुख, आरएसएस),
आनंदीबेन पटेल (मुख्यमंत्री, गुजरात),
आशीष शेलार, ब्राईट
चे योगेश लखानी,
गोपाल शेट्टी, राज पुरोहित, जिग्नेश
हिरानी, कौशिक शहा आणि स्नेहल आंबेकर (मेयर, मुंबई) आले होते.
८ जानेवारी रोजी वुमन
डे साजरा केला जाणार आहे आणि ह्या सोहळ्यासाठी ३०००० महिला उपस्थित राहणार आहे. ९
जानेवारी रोजी राजनाथ सिंह आणि मुरारी बापू येणार आहेत. १० जानेवारी रोजी
प्रंतपधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आचार्य रत्नसुंदरसूरीश्वरजी
महाराज लिखित ३०० वे पुस्तक ‘मारू
भारत, सारूं भारत’ चा लोकार्पण सोहळा
संपन्न होणार आहे.
Comments