झी मराठी वाहिनीवर 'अजूनही चांदरात आहे...'
झी मराठी वाहिनीवर 'अजूनही चांदरात आहे...' ही रोमॅण्टिक थ्रिलर मालिका २७ ऑगस्टपासून आपल्या भेटीला येत आहे. निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता असलेले केदार शिंदे ही मालिका दिग्दर्शित करत आहे. 'अजूनही चांदरात आहे...' या मालिकेची कथा रेवा आणि अनय या दाम्पत्याच्या निरागस आणि बावन्नकशी प्रेमाभोवती गुंफण्यात आली आहे. या दोघांच्या प्रेमावर भूतकाळाच्या सावल्या, परावलौकिक घटनांची पडछाया पडते. मात्र यातून जिद्दीने मार्ग काढत रेवा आणि अनय प्रत्येक नातेसंबंध कसे जोपासतात याची ही रंजक रोचक कथा आहे. या मालिकेची पटकथा केदार शिंदेंचा भाऊ ओंकार शिंदे यांनी लिहिली आहे. या मालिकेच्या निमित्ताने केदार शिंदे ब-याच मोठ्या कालावधीनंतर मालिकेच्या दिग्दर्शनाकडे वळले आहे. या मालिकेत उदय टिकेकर, प्रिया बेर्डे, नेहा गद्रे, अतुल तोडणकर असे अनेक आघाडीचे कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत. 'मन उधाण वा-याचे' मालिकेनंतर अभिनेत्री नेहा गद्रेची ही दुसरी मालिका आहे.
Comments