इंटरव्यू तेजस्विनी पंडित

अंग बाई अरेच्चा, नाथा पूरे आता, गैर सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा जलवा दाखविल्यानंतर आता अभिनेत्री तेजस्विनी पंडित चक्क एका धडाकेबाज भूमिकेत दर्शकांच्या भेटीला चित्रपट वावटळ मधून येत आहे. ह्या चित्रपटाची प्रेस कॉन्फेंस नुकतीच मुंबईतील प्रभादेवी स्थित कोहिनूर होटेल मध्ये संपन्न झाली व त्यावेळी तेजस्विनी बरोबर चर्चा केली.
चित्रपट वावटळ आहे तरी काय ?
वावटळ चित्रपटाची कथा प्रसिद्ध साहित्यित अनंत सामंत यांच्या के-५ ह्या कांदबरीवर आधारालेली असून ह्या मध्ये समाजाचे प्रतिबिंब दाखविण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न केला आहे.
ह्या चित्रपटाची खास बाब काय आहे ?
कोणतीही कलाकृती ही समाजाते प्रतिबिंब असते. समाजात घडणा-या भल्याबु-या घटनांमधून कलाकृतीची जडण-घडण होत असते. समाज भष्ट्राचाराने किती पोखरलेला आहे आणि सामान्य जनता कशी हतबल झालेली आहे, ह्याबद्दल सर्वजण जाणतातच. हाय वावटळ ह्या चित्रपटाचा प्राणबिंदू आहे.
ह्या चित्रपटात काम करताना काय अनुभव आला आहे ?
खरं सांगू का, हा चित्रपट माझ्या अभिनय कैरियर साठी मिल का पत्थर साबित होऊ शकतो. हा चित्रपटाची कथा माझ्या कैरेक्टर येऊन यू-टर्न घेते व त्यानंतर सुरु होतो खरा चित्रपट. ह्या चित्रपटात काम करताना फारच मजा आली व जौधपुर, लोहावट, भिकमकोर मथानी, ओटिया ह्या ठिकाणी शूटिंग करताना भरपूर एन्जॉय केले.
चित्रपट वावटळ मधील भूमिका कशा प्रकारची आहे ?
ह्यामधे माझी भूमिका दमदार स्वरूपाची आहे व हा रोल करण्यापूर्वी मी माझ्या घरच्यांची परवागणी घेतली होती कारण ह्यातील माझी भूमिका बोल्ड स्वरूपाची आहे. परंतु कथानकानुसार माझी भूमिका योग्य असल्यामुळेच मी हा रोल केला आहे. मी माझ्या भूमिकेला पूर्ण पणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे व आता चित्रपट सूपर्ण महाराष्ट्राय २३ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे व दर्शक चित्रपट पाहून ठरवतील कि माझी भूमिका किती पावरफुल होती.
ह्या नंतर येणारे चित्रपट कोणते आहेत ?
रानफूल व टार्गेट येणारे आगामी चित्रपट आहे. चित्रपट रानफूल हा तर साइको-थ्रिलर स्वरूपाचा सिनेमा आहे.
चित्रपट वावटळ मधील दमदार भूमिका साकारताना काय अनुभव आला ?
ह्या चित्रपटात माझी भूमिका बोल्ड होती म्हणून मी पहिलीच मनाची तयारी केली होती व भूमिकेला न्याय देण्याच्या एकमेव उद्देशाने मी ही भूमिका साकारली आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर