झी मराठी वर एका पेक्षा एक अप्सरा आली
"झी मराठी' वर एका पेक्षा एक अप्सरा आली मध्ये नऊ नायिका आता एकमेकीशी टफफाईट देत आहेत. मृण्मयी देशपांडे, नेहा पेंडसे, ऊर्मिला कानेटकर, नेहा जोशी, स्मिता तांबे, "फू बाई फू'मधील आरती सोळंकी, सोनाली खरे व नृत्याची बिजली सुरेखा पुणेकर या तारका आमने-सामने आहेत. त्यांचे नर्तनकौशल्य पणाला लावण्यासाठी फुलवा खामकर, दीपाली विचारे व मयूर वैद्य हे कोरिओग्राफर्स पूर्ण तयार निशी कंबर कसणार आहेत. या पर्वाचे सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री करणार असून, महागुरू सचिन पिळगावकर परीक्षकाच्या खुर्चीत असतील. बुधवारी व गुरुवारी रात्री 9.30 वाजता हा कार्यक्रम प्रक्षेपित होत आहे.
Comments