लेखक किशन पवार यांचा हिंदी चित्रपट ‘तारा’ चालला ऑस्कर एवार्ड जिंकण्यासाठी
चित्रपट बनविणे ही एक कला
आहे आणि चित्रपट बनविल्यानंतर तो सुपरहिट होणे ही दर्शकांना आवडल्याची पोचपावती
असते, पंरतु एखादा चित्रपट जेव्हा ऑस्कर साठी निवडला
जातो, तेव्हा त्या चित्रपटाचे नाव संपूर्ण विश्वात मानाने
घेतले जाते. साल २०१५ फ्रेबुवारी-मार्च महिन्यात होणा-या ऑस्कर एवार्ड साठी ८२
देशांतील ८२ चित्रपट नामांकित झाले आहे. ह्या नामांकनासाठी चुरशीची स्पर्धाच असते.
असाच बहुमोलाचा मान निर्माता-दिग्दर्शक कुमार राज यांचा हिंदी चित्रपट तारा – द
जरनी ऑफ लव एंड पैशन ला मिळाला आहे. वेस्टर्न अफ्रिकन देशा मधील टोगो देशाचे
अध्यक्षांनी ह्या चित्रपटाची ऑस्कर साठी निवड केली आहे. विदेशी भाषा कैटेगरी मधील
उत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून ८७ एकेडेमि एवार्ड २०१४ साठी निवड झाली आहे.
कुमार राज प्रोडक्शन्स व
एचएस सिने आर्ट्स प्रा. लिमिटेड प्रस्तुत चित्रपट तारा – द जरनी ऑफ लव एंड पैशन ने
मुंबई मधील मोठ्या सिनेमा हॉल मध्ये ५० आठवडे पूर्ण केले आहे. ह्या चित्रपटाने आतापर्यंत ३५ अंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत
आणि २६ अंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये भाग घेतला आहे. चित्रपटाची मुख्य
नायिका रेखा राणा हिला देखील उत्कृष्ट हीरोइन चे एकूण १२ पुरस्कार मिळाले आहे. चित्रपटाचे
को-प्रोडयूसर धरम आहेत. चित्रपटाची
प्रसिद्धी शंकर मराठे यांनी केली आहे.
चित्रपटाचे लेखक किशन पवार
हे मुंबई मधील महर्षी द्यानंद कॉलेज, परेल येथे
अध्यापन (इंग्रजी लिटरेचर) करत आहे. हिंदी चित्रपट तारा ऑस्कर साठी निवडला गेला, ही बाब डॉ.प्रो. किशन पवारांसाठी अभिमानाची आहे. पवार
म्हणाले कि एखादा चित्रपट जेव्हा ऑस्कर
साठी निवडला जातो, तेव्हा त्या चित्रपटांची ख्याती संपूर्ण
जगात पसरली जाते. ह्या चित्रपटाच्या लेखनासाठी फार मेहनत घेतली होती. ह्या
चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी बंजारा जाती मधील लोकां मध्ये अडीच वर्ष सहवास केला व
त्यांची भाषा शिकली. बंजारा लोकांची संस्कृति समजून घेतली व त्यांचे जीवन जवळून
बघुन चित्रपटाची कथा लिहीली. गोरमाटी-बंजारा तसेच आदीवासी जातीच्या
स्त्री-पुरुषाचे प्रश्न आणि शासनाच्या दरबारी त्यांच्या बाबतीत होत असलेला
भ्रष्ट्राचार, या गोष्टाली वेशीला टांगले आहे. वृद्ध
लोकांच्या समस्या साठी सरकार कडून तंटपूजी पैसे मिळतात. तसेच त्यांच्या साठी होत
असलेला भ्रष्ट्राचार, या गोष्टींना हिंदी चित्रपट तारा मध्ये
दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
हिंदी चित्रपट तारा – द
जरनी ऑफ लव एंड पैशन मध्ये तारा ही एक बंजारा जातीची तरुणी असून अवैध दारु
बनविण्याचा तिचा व तिच्या पतीचा व्यवसाय आहे, जेव्हा
तिच्या पतीला अटक होते तेव्हा तिचे संपूर्ण गांव दुष्काळाच्या छायेत व भूकमारीशी
झुंज देते. तारा ही निर्णयक समर्थचे बळ घेऊन सर्व गावाच्या समोर एक आदर्श स्त्री
म्हणून उभी राहते.
Comments