अभिनेत्री अर्चना तेंडुलकर चा हिंदी चित्रपट ‘तारा’ चालला ऑस्कर एवार्ड जिंकण्यासाठी



चित्रपट बनविणे ही एक कला आहे आणि चित्रपट बनविल्यानंतर तो सुपरहिट होणे ही दर्शकांना आवडल्याची पोचपावती असते, पंरतु एखादा चित्रपट जेव्हा ऑस्कर साठी निवडला जातो, तेव्हा त्या चित्रपटाचे नाव संपूर्ण विश्वात मानाने घेतले जाते. साल २०१५ फ्रेबुवारी-मार्च महिन्यात होणा-या ऑस्कर एवार्ड साठी ८२ देशांतील ८२ चित्रपट नामांकित झाले आहे. ह्या नामांकनासाठी चुरशीची स्पर्धाच असते. असाच बहुमोलाचा मान निर्माता-दिग्दर्शक कुमार राज यांचा हिंदी चित्रपट तारा – द जरनी ऑफ लव एंड पैशन ला मिळाला आहे. वेस्टर्न अफ्रिकन देशा मधील टोगो देशाचे अध्यक्षांनी ह्या चित्रपटाची ऑस्कर साठी निवड केली आहे. विदेशी भाषा कैटेगरी मधील उत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून ८७ एकेडेमि एवार्ड २०१४ साठी निवड झाली आहे.

कुमार राज प्रोडक्शन्स व एचएस सिने आर्ट्स प्रा. लिमिटेड प्रस्तुत चित्रपट तारा – द जरनी ऑफ लव एंड पैशन ने मुंबई मधील मोठ्या सिनेमा हॉल मध्ये ५० आठवडे पूर्ण केले आहे. ह्या चित्रपटाने आतापर्यंत ३५ अंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत आणि २६ अंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये भाग घेतला आहे. चित्रपटाची मुख्य नायिका रेखा राणा हिला देखील उत्कृष्ट हीरोइन चे एकूण १२ पुरस्कार मिळाले आहे. चित्रपटाचे को-प्रोडयूसर धरम आहेत. चित्रपटाची प्रसिद्धी शंकर मराठे यांनी केली आहे.

हिंदी चित्रपट तारा मध्ये अभिनेत्री अर्चना तेंडुलकर ने महत्वाची भूमिका साकार केली आहे. हिंदी चित्रपट तारा ऑस्कर साठी निवडला गेला, ही बाब अभिनेत्री अर्चना तेंडुलकर साठी अभिमानाची आहे. अर्चना म्हणाली कि ह्या चित्रपटांत मी पाटलीन बाईची भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट ऑस्कर साठी निवडला गेला आहे, त्यामुळे मला फारच आनंद झाला आहे, ह्या चित्रपटात काम केल्यामुळे माझ्या अभिनयरुपी जीवनाचे सोनचं झाले आहे. एखादा चित्रपट जेव्हा ऑस्कर साठी निवडला जातो, तेव्हा त्या चित्रपटांची ख्याती संपूर्ण जगात पसरली जाते.

चित्रपट तारा चे कथानक एका बंजारन स्त्री तारा च्या अवतीभवती गुंफण्यात आली आहे. तारा कशा प्रकारे गावातील लोकांना न्याय देण्यासाठी लढा देते व स्वताच्या आयुष्यात आलेल्या वादळाचा कशा प्रकारे सामना करते. हेच ह्या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न एका आगळया-वेगण्या स्टाइल ने केला आहे. हिंदी चित्रपट तारा – द जरनी ऑफ लव एंड पैशन मध्ये तारा ही एक बंजारा जातीची तरुणी असून अवैध दारु बनविण्याचा तिचा व तिच्या पतीचा व्यवसाय आहे, जेव्हा तिच्या पतीला अटक होते तेव्हा तिचे संपूर्ण गांव दुष्काळाच्या छायेत व भूकमारीशी झुंज देते. तारा ही निर्णयक समर्थचे बळ घेऊन सर्व गावाच्या समोर एक आदर्श स्त्री म्हणून उभी राहते.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर