जावेद अली च्या स्वरात चित्रपट स्पर्श चा म्यूजिकल मुहूर्त



फुटप्रिंट मिडिया एंटरटेनमेंट निर्मिती संस्थे अंतगर्त एम.बी. संखे व विक्की हाडा आणि संदीप मनोहर नवरे दिग्दर्शित स्पर्श... या मराठी चित्रपटाचा मुहूर्त १४ एप्रिल रोजी अंधेरी स्थित एम्पायर स्टुडिओ मध्ये गायक जावेद अली यांच्या सुमधूर गाण्याने पार पडला. चित्रपटाचे संगीतकार बबली हक आहेत. 

चित्रपट स्पर्श... विषयी अधिक माहिती देताना दिग्दर्शक संदीप नवरे म्हणाले कि चित्रपटात १९५० ते १९७५ ह्या कालखंडातील कथा दाखविण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न केला आहे. त्याच बरोबर जाती-भेद व शिक्षण व्यवस्थेवर खास करुन प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्या कालखंडात कशा प्रकारची शिक्षण व्यवस्था होती व इतर महत्वपूर्ण बाबी ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशात येणार आहे.

जगवी जर हो क्षण बावरा तू, का रे मना शोधशी आसरा तू.... हे गाणे गायक जावेद अली यांनी मुहूर्ता च्या वेळी गायले. चित्रपटात एकूण दोन गाणी आहेत.

११ एप्रिल पासून सलगपणे चित्रपटाचे चित्रीकरण सांगली येथे सुरु होणार आहे. चित्रपटात किशोर कदम, प्रमोद, सुलभा देशपांडे व इतर कलाकार आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर