झांगडगुत्ता चित्रपटाचा मुहुर्त संपन्न

फुटप्रिंट मिडिया एंटरटेनमेंट निर्मिती संस्थे अंतर्गत एम.बी. संखे निर्मित व संदीप मनोहर नवरे दिग्दर्शित झांगडगुत्ता या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच अंधेरी स्थित एम्पायर स्टुडिओ मध्ये गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून संपन्न झाला.

यावेळी चित्रपटाचे संगीतकार बबली यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक जावेद अली आणि सैम यांच्या आवाजात चित्रपटांतील गाणी रिकॉर्ड केली. झांगडगुत्ता म्हणजे अनेक घटना आणि प्रसंगाचा झालेला गुंता होय. कैमरामेन जितू आचरेकर व कार्यकारी निर्माते पिंटू कुमार आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपासून सलगपणे चित्रपटाचे चित्रिकरण होणार आहे. चित्रपटात भारत गणेशपुरे, संदिप पाठक, दिव्या कोहली, जयंत सावरकर, ज्योति सुभाष, जयवंत वाडकर इतर कलाकारांच्या विशेष भूमिका आहेत.

दिग्दर्शक संदीप नवरे यांनी चित्रपटा विषयी अधिक माहिती देताना सांगितले कि आता पर्यंत मी हिरवं कुंकु, पकडापकडी, लगर, सासर माझ दैवत, हळद तुझी कुंकु माझ सारखे दर्जेदार चित्रपट बनविले आहे. त्याच बरोबर सध्या गडद जांभळ ह्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. झांगडगुत्ता हा माझा आकरावा चित्रपट आहे. चित्रपटाची शूटिंग ३० एप्रिल पासून सांगली येथील गावामध्ये १५ दिवस होणार आहे. चित्रपटात व-हाडी भाषेतील रैप गाणं आहे व हे मराठी चित्रपटात प्रथमच होत आहे.

निर्माता एम बी संखे म्हणाले कि हा माझा पहिलाच चित्रपट आहे. मी एक बिल्डर असून चित्रपटाची कथा आवडली म्हणूनच मी हा चित्रपट प्रोड्यूस करत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर