वीणा मलिक म्हणती ‘दाल मे कूछ काला है’
‘दाल मे कूछ काला है’ या आपल्या पदार्पणातल्याच चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री ‘डबल रोल’मध्ये दिसणार असून, या भूमिकेमुळे ती अतिशय उत्साहित झाली आहे. ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोमुळे प्रकाशझोतात आलेली वीणा मलिक म्हणते की, चित्रपटात दुहेरी भूमिका पार पाडणे माझ्यासाठी नवीन आहे. पण, वास्तविक जीवनात मी ही भूमिका नेहमीच पार पाडत असते. माझे मूळ नाव झहिदा मलिक आहे आणि बॉलीवूडमध्ये माझी ओळख वीणा मलिक अशी आहे. ही देखील माझ्यासाठी दुहेरी भूमिकाच आहे. मी जर वास्तविक जीवनात यशस्वीपणे ‘डबल रोल’ पार पाडू शकते, तर चित्रपटातही ही भूमिका यशस्वीपणे पार पाडू शकेन, असा विश्वासही तिने व्यक्त केला.
Comments