शिवाजी मंदीर मधील बाळूचा सत्कार
वसंत देसाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रविवारी शिवाजी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ४0 वर्षे चहा देत शिवाजी मंदिरातील कलावंतांची सेवा करणार्या बाळू वासकरचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाळूवर प्रेम करणारे अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, संजय नार्वेकर, सचिन खेडेकर, सुप्रिया पिळगावकर, जयंत सावरकर, शिवाजी साटम असे नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील अनेक आघाडीचे कलावंत उपस्थित होते. ' बाळू वासकरसारख्या अशाच सामान्य माणसांमुळे कलावंतांना बळ मिळत असते. म्हणूनच दरवर्षी असा सामान्य माणसांचा असामान्य सत्कार सोहळा आम्ही करू, असे भालेकर यांनी यावेळी सांगितले. या सत्कार सोहळ्यात कलाकारांतर्फे एक लाख रुपयांचा गौरवनिधी बाळू वासकरला देण्यात आला.
Comments