मी पाहिलेला पहिला अभिनेता दादा कोंडके
साल 1985 मध्ये परेल टैंक रोड, साईबाबा पथ स्थित अभ्युदय सेंकडरी स्कूल मध्ये सातवी इयत्तेत शिकत होतो व त्यावेळी गणेशोत्सवाचा सण सुरु होता. शाळा सुटल्यावर संध्याकाळी 6 वाजता गणेश गल्ली येथील सर्वात ऊंच गणपती पाहण्याच्या इच्छेने मी गणेश गल्ली येथे गणपती पाहण्यासाठी गेलो. शाळे पासून गणेश गल्ली फक्त 10-15 मिनिटावर आहे. गणपती पाहण्यासाठी लाइन मध्ये उभा होतो. तेवढ्यात बाजुला एक जीप येऊन उभी राहिला व त्या जीप कडे गणेश मंडळातील कार्यकर्ते धावुन आले. तेव्हा मी पाहिले की जीप मधून चक्क सफेद कुर्ता-पायजमा मध्ये अभिनेता दादा कोंडके खाली उतरले व आपल्या खास शैली मध्ये म्हणाले कि मित्रानों आलो की नाही न विसरता आपल्या गणपतीच्या दर्शनाला... असे म्हणून दादा आपल्या सर्व मित्रांबरोबर गणरायांचे दर्शन घेण्यासाठी मंडपात गेले व मी दादांचा भोळापण बघतच राहिलो. दुस-या दिवशी शाळेत गेल्यावर सर्व मित्रांना हा गमंतीदार किस्सा सांगितला.
Comments