बिग बीचा ‘उंचाई’ 11.11.2022 रोजी रिलीज होणार

शंकर मराठे - मुंबई, 25 जुलै 2022 - सूरज आर. बडजात्या दिग्दर्शित राजश्री प्रोडक्शनचा साठावा चित्रपट ‘उंचाई’ ११.११.२०२२ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. राजश्री प्रोडक्शनच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही घोषणा करण्यात आली आहे. बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या राजश्री प्रोडक्शनने ७५ व्या वर्षात पदार्पण केलेले असून त्यानिमित्ताने हा हिरक महोत्सवी चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

‘उंचाई’मध्ये बॉलिवूडमधील सगळ्यात नामवंत कलाकार प्रथमच एकत्र आलेले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतले हे हिरेच आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, नीना गुप्ता, परिणीती चोप्रा यांच्यासह सारिका, नफीसा अली सोधी आणि डॅनी डेन्ग्झोंपा यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. अशा या मल्टीस्टारर ‘उंचाई’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभवी दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या यांनी केले आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कमलकुमार बडजात्या, स्वर्गीय राजकुमार बडजात्या आणि राजश्रीचे अजितकुमार बडजात्या यांनी महावीर जैन फिल्म्सचे महावीर जैन आणि बाउंडलेस मीडियाच्या नताशा मालपाणी ओसवाल यांच्यासोबत सहभागिता केलेली आहे.

‘उंचाई’चे या वर्षाच्या सुरुवातीला मुख्य चित्रिकरण पूर्ण करण्यात आले. नेपाळ, दिल्ली, मुंबई, आग्रा, लखनौ आणि कानपूरमध्ये या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण करण्यात आले आहे. दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या या चित्रपटाच्या निमित्ताने ७ वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतत आहेत. राजश्रीच्या यापूर्वीच्या सर्व चित्रपटांप्रमाणेच,  निखळ आणि विचारप्रवर्तक मनोरंजनाचा वारसा पुढे नेत, ‘उंचाई’ संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करण्याची ग्वाही देत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर