अभिनेते विक्रम गोखले म्हणाले जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो असतो
Shankar Marathe, Mumbai - 15 November, 2021 : पुण्यात ब्राह्मण महासंघाच्यावतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना विक्रम गोखले यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करत विविध मुद्द्य्यांवर प्रतिक्रिया दिली. त्याचप्रमाणे मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणावर देखील ते बोलले. “देशाच्या सीमेवर २१ वर्षांचा जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो असतो. आर्यन हिरो नाही, मी अत्यंत स्पष्ट सांगतो. शाहरुख आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकणार नाही.” असं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.
Comments