Marathi Film 'Sarv Mangal Savdhan'

Marathi Film 'Sarv Mangal Savdhan'

Actress - Manjari Fadnis

First look of Sarv Mangal Savdhan



 सर्व मंगल सावधान मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

निर्माता  उत्पल आचार्य, ललित तेहलान, प्रियांक सिंह, अभिषेक जैन, आशिष वाघ, नूरमोहम्मद व दिग्दर्शक राहिल खान यांचा पहिला मराठी चित्रपट सर्व मंगल सावधान चा मुहूर्त अभिनेता राकेश बापट यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून करण्यात आला. ह्या शुभ प्रसंगी चित्रपटांतील सर्व कलाकार, तंत्रज्ञ व इंडस्ट्रीतील वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते.
अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री मंजिरी फडणीस यांच्या हस्ते चित्रपट सर्व मंगल सावधान च्या पहिल्या पोस्टर चे लॉचिंग करण्यात आले. अभिनेता राकेश बापट म्हणाला कि हया चित्रपटात माझा रोल दमदार आहे.

अभिनेत्री मंजिरी फडणीस म्हणाली की माझा हा पहिला मराठी चित्रपट आहे. यापूर्वी मी हिंदी, तेलुगू, तमिल, कन्नड, मलयालम, बंगाली भाषेत काही चित्रपट केले आहेत. सर्व मंगल सावधान ह्या चित्रपटांत मी एक सिंपल मुलगी आहे. चित्रपटाचे नाव सर्व मंगल सावधान आहे तर सर्वांना चित्रपटाचा आशय समजला असेलच. चित्रपटांची कथा रि-अरेंज मैरेज वर आधारीत असून धम्माल मस्तीचा झक्कास नजराना दर्शकांना पहावयास मिळणार आहे.

दिग्दर्शक राहिल खान यांनी चित्रपटा विषयी अधिक माहिती देताना सांगितले कि माझा हा पहिला मराठी चित्रपट आहे. रि-अरेंज मैरेज करताना कशा प्रकारची धम्माल उडते व त्यावेळची कशा प्रकारची स्थिति निर्माण होते. त्याच बरोबर ह्या चित्रपटात सपूर्ण महाराष्ट्रीयन संस्कृति दाखविणार आहे. कॉमेडी बरोबर फैमिली ड्रामा आहे. एवढच काय तर ह्या चित्रपटांचे चित्रिकरण मुंबई, हैदराबाद व गोवा मध्ये करण्यात येणार आहे.

निर्माता अभिषेक जैन सांगतात कि मराठी चित्रपटांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक तारे-तारका, दिग्दर्शक, निर्माते वळले आहेत. मराठी चित्रपटांना ग्लैमर प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न हिंदीतील कलावंत-तंत्रज्ञ-दिग्दर्शक-निर्मात्यांमुळे अलिकडे मोठ्या प्रमाणावर केला जातोय. आम्ही देखील एक चांगला मराठ-मोळा विषय घेऊन सर्व मंगल सावधान ह्या चित्रपटाची निर्माती करत आहे. रि-अरेंज्ड मैरेज करताना कशा प्रकारची धम्माल येते व त्यावेळी काय-काय पहावयास मिळते, हेच सर्व मंगल सावधान ची खासियत आहे.

संगीतकार निखिल कामत म्हणाले कि ह्या चित्रपटांत एकूण ५ गाणी असून सर्व गाणी वेगवेगळया स्टाइलची आहे. रोमांटिक गाण्या बरोबर लग्नांचे गाणं देखील आहे. प्रत्येक गाण्याचं म्यूजिक जरा हटके असेल, ह्यावर जास्त भर दिला गेला आहे.

चित्रपटांतील मुख्य कलाकार राकेश बापट व मंजिरी फडणीस असून इतर कलाकार विवेक लागू, अशोक समेळ, अश्विनी इकबोटे, वंदना मराठे, उत्कर्षा नाइक, अपूर्वा परांजपे, मधूरा गोडबोले, स्नेहा आणि शेरजील खान आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर