मराठी चित्रपट इंडियन प्रेमाचा लफडा चे म्यूजिक लांच



एमआरपी फिल्म्स प्रस्तुत निर्माता मोहन पुरोहित व दिग्दर्शक दिपक कदम चा नवा मराठी चित्रपट इंडियन प्रेमाचा लफडा चे म्युजिक खासदार श्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते लांच करण्यात आले. ह्या वेळी चित्रपटातील सर्व कलाकार, संगीतकार, गायक व संपूर्ण प्रोडक्शन टीम उपस्थित होती. तसेच अभिनेत्री शितल उपारे ने धमाकेदार नृत्य सादर करुन ह्या संगीतमय कार्यक्रमाची शोभा वाढविली, जणू काही आकाशातील चंद्र व चांदण्या ह्या संगीतमय कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थितच झाल्या होत्या.

श्री रामदास आठवले म्हणाले कि हया चित्रपटा मधील गीत-संगीत अतिशय शानदार आहे व चित्रपट देखील तितकाच उत्तम व मनोरंजक बनविला आहे. इंडियन प्रेमाचा लफडा हा चित्रपट शंभर टक्के दर्शकांचे मनोरंजन करेल, ह्याबद्दल तर काही शंकाच नको. कारण हा चित्रपट शानदार व लाजवाब आहे.

चित्रपटाचे निर्माता मोहन पुरोहित यांनी सांगितले कि ह्या चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत व सर्व गाणी वेगवेगळ्या स्टाइलची आहे. रोमांटिक लव सांग आहे तर भक्तिमय गणराया मोरया हे गाणे देखील आहे.
 
दिग्दर्शक दिपक कदम चित्रपटां विषयी माहिती देताना म्हणाले कि चित्रपटाचे नाव इतकेच धमाकेदार आहे कि हा चित्रपट नक्कीच दर्शकांना पसंत पडेल. चित्रपट इंडियन प्रेमाचा लफडा मध्ये रोमांटिक लव स्टोरी आहे व अजून ही बरचं काही आहे, ते सांगण्या पेक्षा चित्रपट पाहणेच योग्य होईल, कारण चित्रपट तितकाच मनोरंजक आहे.

मिस हेरिटेज इंटरनेशनल इंडिया शीतल उपारे ने ह्या चित्रपटां द्वारे मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आहे. शीतल उपारे ने सांगितले कि हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे व ह्या मध्ये मी आरोही चे पावरफुल कैरेक्टर साकारले आहे. माझा रोल दमदार व रोमांटिक स्वरूपाचा आहे.

चित्रपटातील मुख्य कलाकार शीतल उपारे, स्वप्निल जोशी ज्यूनियर, संतोष मयेकर, विजय पाटकर, विजय कदम, सिया पाटील, सुनील तावडे, ऊषा साटम, लेखा राणे आहेत. गायक आदर्श शिंदे, बेला शिंदे, मि, श्रुती राणे, स्वप्निल बांदोडकर, विक्रांत भारती व सुमधुर संगीत आशिष डोनाल्ड दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर