नेत्रहीनांचा संगीतमय दिपोत्सव
दिवाळी सण हा मोठा नाही आनंदाचा तोटा. त्याचबरोबर दिपावली हा सण म्हणजेच ख-या अर्थाने रंगेबेरंगे दिव्याचा सण असतो. हा सण सर्वजण गोड-गोड पदार्थाने आणि रंगेबेरंगे आतिशबाजीने मोठ्या जल्लोषात करतात. दिपावलीचे दीप आपण घरात दरवाजात लावून संपूर्ण परिसर तेजोमय करतो, परंतु आज ही कित्येक असे लोक आहे कि ज्यांचे आयुष्यच अंधारात आहे, ज्यांना आपण नेत्रहीन म्हणतो.
इंडिया मिडीया लिंग एंड इवेन्ट्स मैनेजमेंट नेहमीच सामाजिक कर्तव्याचे
भान राखून नेत्रहीन, अपंग, अनाथ व गोरगरीब मुलांसाठी
कार्य करत असते. परंतु ह्या वर्षी काहीतरी आगळे-वेगळे सामाजिक कार्य करण्याचा एकमेव
उद्देशाने श्री. के. रवि यांनी लक्ष्मीपूजन च्या एक दिवस अगोदर गेटवे ऑफ इंडिया येथील
समुद्रात मध्ये रात्री चक्क बोटीमध्ये नेत्रहीन मुलांसाठी दिपोत्सव साजरी केला. हा कार्यक्रम नेत्रहीन मुलांनी आनंदाने नाचुन-गाऊन
साजरी केला. एवढंच काय तर नेत्रहीन मुलांनी नृत्यांचा अविष्कार दाखवुन कार्यक्रमाची
शोभा वाढविली.
समाजसेवक व उद्योजक श्री. के. रवि म्हणाले कि मी एक
समाजसेवक आहे व उच्च स्तरावर समाजसेवा करता यावी ह्याच एकमेव सामाजिक उद्देशाने नेत्रहीन
व अनाथ मुलांसाठी कार्य करत असतो. त्याच बरोबर गरीब लोकांची सेवा करणे, गरजू लोकांना रोजगार मिळविण्यासाठी घडपड करणे, गरजू
विद्यार्थांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे,
अपंग व नेत्रहीन मुलांना वेळोवेळी मदत करणे. असे अनेक उपक्रम राबवित असतो, जेणे करुन माझ्या हातून जास्तीत-जास्त समाजकार्य घडावे व गोरगरीबांची
सेवा करता यावी.
नेत्रहीनांचा संगीतमय दिपोत्सव साजरा करण्यासाठी
श्री. के. रवि यांचे अनेक कार्यकर्ते तसेच अभिनेता राहुल रवि, अभिनेत्री भाग्यश्री मेश्राम, दिग्दर्शक अनिल म्हात्रे उपस्थित होते.
Comments