स्नेहल तरडे साकारणार "सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते"

 

शंकर मराठे  - मुंबई, 27 एप्रिल 2022 - सुप्रसिद्ध लेखकदिग्दर्शकअभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चितभव्यदिव्य ऐतिहासिक "सरसेनापती हंबीररावया महाराष्ट्राचा महासिनेमाच्या आज प्रदर्शित झालेल्या पोस्टरने स्नेहल तरडे या छत्रपती ताराराणी यांच्या मातोश्री "सौलक्ष्मीबाई हंबीरराव मोहितेयांची भूमिका साकारत आहेत हे स्पष्ट झाले आहेछत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रविण तरडे साकारत आहेत त्यामुळे या निमित्ताने उभ्या महाराष्ट्राला प्रविण तरडे आणि स्नेहल तरडे हे रियल लाईफमध्ये एकमेकांची खंबीर साथ देणारे पती पत्नी आता रील लाईफमध्येही एकमेकांना साथ देताना पाहायला मिळणार आहेत.

स्नेहल तरडे यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास अत्यंत वेगळ्या पद्धतीने सुरू झालाकॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धेसाठी सीलेक्ट झालेल्या एका मैत्रिणी बरोबर त्या सहजच प्रॅक्टिस बघायला गेल्या पण तिथे त्यांची ऑडिशन घेतली गेली आणि त्यांना अभिनयासाठी सीलेक्ट केलं गेलंरंगमंचावर वावरताना त्यांना अभिनय क्षेत्राची आवड निर्माण झालीमानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार पटकावलाया स्पर्धेबरोबरच त्यांनी इतर विविध नाट्य स्पर्धा 30 पेक्षा जास्त पारितोषिके मिळवून गाजवल्यापुढे अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये तसेच अभिमान आणि तुझं माझं जमेना या टीव्ही सिरीयल मध्ये काम केलेलग्नानंतर काही काळ ब्रेक घेतल्यानंतर शाळाचिंटूचिंटू देऊळ बंदमुळशी पॅटर्न यांसारख्या दर्जेदार चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली तसेच काही काळ पोलीस खात्यात सेवा रूजू केलीबाहुबली आणि बाहुबली 2 या मराठीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे अनुरूप मराठी संवाद लेखन स्नेहल यांनी केले आहेस्नेहल यांना भाषेची आवड असल्याने त्यांनी मराठी बरोबरच फ्रेंच आणि संस्कृत भाषेचे शिक्षण घेतले आहे  सध्या त्या वेद अध्ययन करत आहेतअशा या बहुआयामी आणि अष्टपैलू कलाकार स्नेहल तरडे यांनी "सरसेनापती हंबीररावया चित्रपटात सौलक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते यांची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे.

संदीप मोहितेपाटील प्रस्तुतउर्वीता प्रॉडक्शन्सच्या शेखर मोहितेपाटीलसौजन्य निकमधर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’  हा भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपट आज पासून ३० दिवसांनी म्हणजेच येत्या 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर