Posts

Showing posts from November, 2021

अधिकारी कसा असावा ...

अधिकारी मदत करणारा असावा परंतु वाइफळ चर्चा करणारा नसावा अधिकारी काम करणारा असावा परंतु टाइमपास करणारा कदापि नसावा अधिकारी पाणी पाजणारा असावा परंतु चहा-पाणी मागणारा नसावा अधिकारी भाकरी खाणारा असावा परंतु लाच मागून खाणारा नसावा -- लेखक शंकर मराठे

माणूस कसा असावा ...

माणूस स्पष्टवादी टाइपचा असावा महिला प्रमाणे निंदा करणारा नसावा माणूस धाडसीवृत्तीचा असावा दुस-याच्या खांदयावर बंदूक ठेवुन गोळी मारणारा नसावा माणूस समाजाचा विचार करणारा असावा स्व:ताच्या फायदयासाठी दुस-याचा बळी देणारा नसावा -- लेखक शंकर मराठे

अभिनेते विक्रम गोखले म्हणाले जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो असतो

Shankar Marathe, Mumbai -  15 November, 2021 :  पुण्यात ब्राह्मण महासंघाच्यावतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना विक्रम गोखले यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करत विविध मुद्द्य्यांवर प्रतिक्रिया दिली. त्याचप्रमाणे मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणावर देखील ते बोलले. “देशाच्या सीमेवर २१ वर्षांचा जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो असतो. आर्यन हिरो नाही, मी अत्यंत स्पष्ट सांगतो. शाहरुख आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकणार नाही.” असं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.