'सरसेनापती हंबीरराव टीम'ची रुग्णवाहिका पुणेकरांच्या सेवेला


 शंकर मराठे  - मुंबई, ११ एप्रिल २०२१ : आगामी 'सरसेनापती हंबीरराव'  या मराठी चित्रपटाचे निर्माते  संदीप रघुनाथराव मोहिते पाटील  यांच्या संकल्पनेतून  सामाजिक बांधिलकी म्हणून "मोफत रुग्णवाहिका" या सेवेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.


आजही राज्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट असताना पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी म्हणून समाजहितासाठी काहीतरी करण्याचा विचार टीम सरसेनापती हंबीरराव च्या मनात होता. त्यादृष्टीने आज पासून टीम सरसेनापती हंबीरराव तर्फे एक सामाजिक बांधिलकी म्हणून पुणे शहरासाठी ऑक्सिजनसह सर्व सोई सुविधायुक्त विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. आज पासून ही रुग्णवाहिका संपूर्ण पुणे शहरासाठी विनामूल्य उपलब्ध आहे.


इथून पुढेही ज्या ज्या वेळी आपले राज्य किंवा देश संकटात असेल त्यावेळी सामाजिक भान जपत मदतीचा हात देण्यास आमची संपूर्ण 'सरसेनापती हंबीरराव टीम' नेहमीच अग्रेसर असेल, असे संदिप मोहिते पाटील आणि सौजन्य निकम यांनी सांगितले.


पुणे शहरात या मोफत सेवेसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले:


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर