'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' तिसऱ्या पर्वाचे शतक पूर्ण!
शंकर मराठे - मुंबई, ३ एप्रिल २०२१ : मनोरंजनासोबतच समाज प्रबोधनाला प्राधान्य देत ‘फक्त मराठी वाहिनी’ने सातत्याने नव्यानव्या कथा कल्पनांसाठी आपलं व्यासपीठ खुलं केलेलं आहे.‘अभिमान भाषेचा वारसा कलेचा’ हे ब्रीद असलेल्या 'फक्त मराठी वाहिनी'वर विविधनवनवे विषय असलेल्या मनोरंजककार्यक्रमांची शृंखला सुरु आहे. 'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' या अनोख्यासामाजिक कार्यक्रमाची निर्मिती करूनआपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे.'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी'च्या तिसऱ्या पर्वाने नुकतीच शंभरी पार केली आहे. या मालिकेचे दररोज सकाळी ७ :०० वाजता नवे भाग आणि पुनर्प्रेक्षेपित सकाळी ६:०० वाजता प्रसारित होतात. येत्या शुक्रवारी या कार्यक्रमाचा शतकोत्सवी भाग सकाळी ७:०० वाजता आणि पुनर्प्रेक्षेपण शनिवारी सकाळी ६:०० वाजता प्रसारित होणार आहे.
Comments