गोल्डन जुबली चित्रपट तारा – द जरनी ऑफ लव एंड पैशन
कुमार राज प्रोडक्शन्स व
एचएस सिने आर्ट्स प्रा. लिमिटेड प्रस्तुत चित्रपट तारा – द जरनी ऑफ लव एंड पैशन ने
नुकताच ५० वा आठवडा मुंबईच्या एम्परियल थिएटर मध्ये संपन्न केला आहे. एवढचं काय तर
आता देखील हा चित्रपट मुंबई व इतर ठिकाणी सुरु आहे. चित्रपट तारा ने ५० वा सप्ताह
पूर्ण करुन बॉलीवुड मधील २१ वर्षाचा रिकॉर्ड ब्रेक केला आहे.
निर्माता-दिग्दर्शक कुमार
राज म्हणाले कि ह्या चित्रपटाने आतापर्यंत ३० अंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले
आहेत. त्या मध्ये उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट
दिग्दर्शक व इतर पुरस्कारांचा समावेश आहे. चित्रपटाचे को-प्रोडयूसर धरम आहेत. चित्रपटाची
मुख्य नायिका रेखा राणा हिला देखील उत्कृष्ट हीरोइन चे एकूण ९ पुरस्कार मिळाले आहे.
निर्माता-दिग्दर्शक व हीरोइन रेखा राणा ला आयएफएफए व कैन मध्ये देखील आमंत्रित
केले होते.
चित्रपट तारा चे कथानक एका
बंजारन स्त्री तारा च्या अवतीभवती गुंफण्यात आली आहे. तारा कशा प्रकारे गावातील
लोकांना न्याय देण्यासाठी लढा देते व स्वताच्या आयुष्यात आलेल्या वादळाचा कशा
प्रकारे सामना करते. हेच ह्या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न एका आगळया-वेगण्या
स्टाइल ने केला आहे.

Comments