गारपीटग्रस्तांच्या आत्महत्यांवर बनलाय लघुपट `आयुष्य’ - Bollywood Market
शेतकरी गारपीटीमुळे आत्महत्या का करतो ? ही सत्य घटना निर्माता के.रवि यांनी मराठी लघुपट `आयुष्य’ मधून दाखविण्याचा एक आगळावेगळा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारचा लघुपट मराठी भाषेत पहिल्यांदाच बनला आहे.
काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या गारपीटीमुळे हजारो
शेतक-यांचे आर्थिक नुकसान होऊन घरे उदध्वस्त झाली. तर
त्यातील जवळपास १५० शेतक-यांनी आत्महत्या केल्या. शासनाने त्या शेतक-यांना आर्थिक
मदतीची घोषणा केली असली तरी ही त्यांच्यापर्यंत पोहचली का ? एवढंच काय तर काही सेवाभावी संस्था व एनजीओ
संस्थांनी देखील आपल्या परीने मदत केली, परंतु शेतक-यांपुढे
आत्महत्या हाच अंतिम पर्याय आहे का ? यासारख्या बाबींचा
आढावा घेऊन श्री कडतोबा मुव्हीज प्रोडक्शन कंपनीने आयुष्य नावाचा मराठी लघुपट
निर्मित केला आहे. पंचवीस मिनिटांचा असलेला हा लघुपट ठाणे जिल्हयातील आसनगाव मधील
माहुली गावात अवघ्या दोन दिवसांत चित्रित केला आहे. या लघुपटात गारपीटीमुळे
शेतक-यांचे झालेले नुकसान व सावकारांकडून शेतीसाठी घेतलेले कर्ज ते फेडू न
शकल्यामुळे कित्येकांनी केलेल्या आत्महत्या हा विषय घेतला आहे.

या लघुपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते व दिग्दर्शन
अभिजीत हरिशचंद्र यांनी केले आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार राहुल रवि, भाग्यश्री मेश्राम, मंगेश कानगे, स्मित जयकर, संकेत व के. रवि आहेत.
के. रवि यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाला संगीत अशोक
वायंगणकर यांनी दिले आहे. ह्या चित्रपटांत हरवला चंद्र माझा, हरवल्या दाही दिशा, डोळ्यातून पूर का वसाइरला... सारखे खरोखरच डोळ्यातून अश्रू आणणारे गाणे आहे.
Comments