Posts

Showing posts from May, 2014

धार्मिक मालिका जय मल्हार

Image
मणी आणि मल्ल या उन्मत्त दैत्यांनी भूतलावर उच्छाद मांडत सप्तर्षींच्या पूजेत वारंवार विघ्न आणलं. त्रस्त सप्तर्षींच्या विनंतीनुसार महादेवांनी मार्तंड भैरवाचा अव तार धारण करून मणी आणि मल्लाचं पारिपत्य केलं. असुरांच्या त्रासापासून मुक्त झालेल्या सप्तर्षींनी महादेवांना भूतलावर वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानुसार मल्हारी मार्तंडाच्या म्हणजेच खंडोबाच्या रूपात महादेवांनी जेजुरी नगरीत वास केला. शिवभक्त तिम्माशेठ यांच्या अत्यंत अनुरूप कन्येचं – म्हाळसेचं स्थळ खंडोबासाठी चालून आलं. त्याच वेळी देवर्षी नारदांनी खंडोबांना बाणाई नावाची महादेवांची एक अत्यंत निस्मीम भक्त असल्याची माहिती दिली. खंडोबांची भेट आधी कोण घेईल - म्हाळसा आणि बाणाई ? झी मराठी वर धार्मिक मालिका जय मल्हार चे सोमवार ते शनिवार ७ वाजता प्रक्षेपित होत आहे.

ग्लैमरस नटी बनली तेजा देवकर

Image
सध्या तर फिल्म इंडस्ट्री मध्ये मराठी चित्रपटाने जणू काही धूमाकूळच घातला आहे. हिंदी चित्रपटा प्रमाणेच आता मराठी चित्रपट देखील बनु लागले आहेत. नव-नवीन कथानकावर मराठी चित्रपट बनत आहेत व चित्रपट बनविण्याची स्टाइल देखील आता हिंदी प्रमाणेच झाली आहे. अशाच एका आगळा-वेगळ्या कथानका वर चित्रपट येत आहे नटी. सूर्यतेज प्रोडक्शन च्या बैनर खाली निर्मित गिरीश भदाणे – नीता देवकर चा नवा चित्रपट नटी मध्ये अभिनेत्री तेजा देवकर ने मुख्य भूमिका साकारली आहे. ह्या चित्रपटात तेजा ने कशा प्रकारची भूमिका साकारली आहे व अन्य अनेक प्रश्नांची उत्तरे तेजा ने एकदम झकास स्टाइल मध्ये दिली. मुंबई मधील अंधेरी पश्चिम स्थित तेजा देवकर च्या घरी घेतलेली एक झकास मुलाखत – चित्रपट नटी ची कथा स्व. अभिनेत्री जिया खान वर आधारित आहे असे काही वर्तमान पत्रात प्रकाशित झाले होते, हे खरं आहे का ? हे सर्व काही खोट आहे. खरं सांगू का चित्रपट नटी ची शूटिंग सुरु होऊन ५-६ महीने झाले होते त्यावेळी काही मिडिया वाल्यांनी चित्रपट नटी चा प्रचार असा केला होता कि ह्या मध्ये स्व. अभिनेत्री जिया खान ची सुसाइड स्टोरी आहे. परंतु असा काह...

Interview - Teja Devkar

Image

Singer - SAM

Image

Interview - Ekta Kapoor

Image