गणेशोत्सवात शेमारू एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन आली २ धमाल स्पर्धा
शंकर मराठे -- मुंबई, १३ सप्टेंबर २०२१:- भारतातील आघाडीचे कन्टेन्ट पॉवरहाऊस शेमारू एंटरटेनमेंटची मराठी चित्रपट वाहिनी शेमारू मराठीबाणाच्या दर्शकांसाठी यंदाचा गणेशोत्सव खास ठरणार आहे कारण या उत्सवाचे औचित्य साधून शेमारू मराठीबाणा वाहिनीने विशेष स्पर्धांचे आयोजन केले आहे. या गणेशोत्सवात शेमारू मराठीबाणा वाहिनी प्रेक्षकांसाठी दोन धमाल स्पर्धा घेऊन आली आहे. 'माझा बाप्पा, माझा मराठीबाणा' या स्पर्धेत प्रेक्षकांना त्यांच्या घरच्या बाप्पासोबतचा फोटो वाहिनीसोबत शेअर करायचा आहे. हे फोटो प्रेक्षक वाहिनीच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर या सोशल माध्यमांवर पाठवू शकतात. या फोटोमध्ये तुम्ही गणपतीसाठी केलेली सजावटीची संकल्पना दाखवू शकता किंवा पारंपरिक मराठी पेहरावात सजलेले संपूर्ण कुटुंब व त्या कुटुंबाचा बाप्पा, पारंपरिक नैवेद्य आणि श्रीगणेशाची मूर्ती असे फोटो तुम्ही पाठवू शकता. 'आरती माझ्या बाप्पाची' या स्पर्धेत प्रेक्षक त्यांच्या घरच्या आरतीचे व्हिडिओ वाहिनीसोबत शेमारू मराठीबाणाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करू शकतात. निवडक आरत्यांचे व्हिडिओ शेमारू मराठीबाणा वाहिनीवर दाखवण्...