SSR Case -- रियाला जेलमध्ये जेवण्यास काय-काय मिळते?


सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला NCB ने अटक केली आहे. ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली मंगळवारी तिला अटक झाली असून तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रिया तुरुंगात गेल्यानंतरही तिच्याविषयी चर्चा अद्यापही रंगत आहेत. यामध्येच आता रियाला तुरुंगात पहिल्या दिवशी कोणतं जेवण देण्यात आलं हे 'इंडिया टुडे'च्या वृत्तात सांगण्यात आलं आहे कि  ड्रग्स सेवन व अन्य आरोपांखाली अटक झालेल्या रियाची भायखळा येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याच कारागृहात शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीदेखील आहे. तसंच या तुरुंगात ६ बॅरेक असून प्रत्येक बॅरेकमध्ये जवळपास ४० ते ५० आरोपी असतात. येथेच रियादेखील राहत आहे.
तुरुंगात रियाला एक चादर, बेडशीट, उशी आणि चटई देण्यात आली आहे. तसंच गरजेच्या वस्तू ठेवण्यासाठी तिला एक मोठी पिशवीदेखील देण्यात आली आहे. तसंच रियाला तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणेच जेवण देण्यात येत आहे. या जेवणामध्ये दोन पोळ्या( चपाती), एक वाटी भात, एक वाटी वरण( डाळ) आणि एक भाजी यांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA