Posts

Showing posts from October, 2022

"१७०१ पन्हाळा" या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण सध्या पुण्याजवळ तळेगाव येथे सुरु

Image
  शंकर मराठे, मुंबई - २२/१०/२०२२ : एस. गोगावले प्रॉडक्शन निर्मित "१७०१ पन्हाळा" या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण सध्या पुण्याजवळ तळेगाव येथे सुरु आहे. आपला चित्रपट जास्तीतजास्त वास्तवदर्शी असावा जेणेकरून चित्रपट बघताना प्रेक्षकांना आपण तो काळ प्रत्यक्ष अनुभवत आहोत असे वाटले पाहिजे ही भावना ठेऊन निर्माते स्वप्नील गोगावले प्रचंड मेहनत घेऊन "१७०१ पन्हाळा"ची निर्मिती करीत आहेत. त्यासाठी मराठी ऐतिहासिक सिनेमातील आतापर्यंतचा सर्वात भव्य दिव्य असा सेट उभारण्यात आलेला आहे, या सेट मागे या सिनेमाची संपूर्ण संपूर्ण टीमची पण खूप मेहनत आहे. अवकाळी पावसाने सध्या धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे सेटचे कुठलेही नुकसान होऊ नये आणि चित्रीकरण अखंडित सुरु राहिले पाहिजे यासाठी इंडस्ट्रिअल एरियामध्ये तब्बल २० हजार स्क्वेअर फूटापेक्षा  जास्त आकाराच्या बंदिस्त शेडमध्ये हा सेट उभा केला आहे. या भव्य सेटमध्ये विविध दालने, दरबार आणि क्रोमा सेटअप उभा केला आहे, त्याबरोबरच प्रकाश योजना सुद्धा अगदी कालानुरूप वाटावी अशी केली आहे. निर्माते स्वप्नील गोगावले खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहिल्यामुळे या चित्रप