Posts

Showing posts from April, 2021

'सरसेनापती हंबीरराव टीम'ची रुग्णवाहिका पुणेकरांच्या सेवेला

Image
 शंकर मराठे  - मुंबई, ११ एप्रिल २०२१ : आगामी 'सरसेनापती हंबीरराव'  या मराठी चित्रपटाचे निर्माते  संदीप रघुनाथराव मोहिते पाटील  यांच्या संकल्पनेतून  सामाजिक बांधिलकी म्हणून "मोफत रुग्णवाहिका" या सेवेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. आजही राज्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट असताना पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी म्हणून समाजहितासाठी काहीतरी करण्याचा विचार टीम सरसेनापती हंबीरराव च्या मनात होता. त्यादृष्टीने आज पासून टीम सरसेनापती हंबीरराव तर्फे एक सामाजिक बांधिलकी म्हणून पुणे शहरासाठी ऑक्सिजनसह सर्व सोई सुविधायुक्त विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. आज पासून ही रुग्णवाहिका संपूर्ण पुणे शहरासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. इथून पुढेही ज्या ज्या वेळी आपले राज्य किंवा देश संकटात असेल त्यावेळी सामाजिक भान जपत मदतीचा हात देण्यास आमची संपूर्ण 'सरसेनापती हंबीरराव टीम' नेहमीच अग्रेसर असेल, असे संदिप मोहिते पाटील आणि सौजन्य निकम या

Nasha Chadh Gaya

Image
Shankar Marathe, Mumbai - 3 April, 2021 :  Keshav is excited and looking forward to his new party banger “Nasha Chadh Gaya" which is slated to release somewhere in mid April.  Nasha Chadh Gaya is high on its crazy beat drops, grand visuals and steamy chemistry between Keshav and Khushi, It has the pump to get everyone in the clubs go gaga. Keshav Malhotra says "Can't wait for the release. Ever since we released the first look, fans are excited and looking forward to song. Nasha Chadh Gaya is a much needed track to escape from COVID blues"

'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' तिसऱ्या पर्वाचे शतक पूर्ण!

Image
 शंकर मराठे  - मुंबई, ३ एप्रिल २०२१ : मनोरंजनासोबतच समाज प्रबोधनाला प्राधान्य देत ‘फक्त मराठी वाहिनी’ने सातत्याने नव्यानव्या कथा कल्पनांसाठी आपलं व्यासपीठ खुलं केलेलं आहे.‘अभिमान भाषेचा वारसा कलेचा’ हे ब्रीद असलेल्या 'फक्त मराठी वाहिनी'वर विविधनवनवे विषय असलेल्या मनोरंजककार्यक्रमांची शृंखला सुरु आहे. 'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' या अनोख्यासामाजिक कार्यक्रमाची निर्मिती करूनआपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे.'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी'च्या तिसऱ्या पर्वाने नुकतीच शंभरी पार केली आहे. या मालिकेचे दररोज सकाळी ७ :०० वाजता नवे भाग आणि पुनर्प्रेक्षेपित सकाळी ६:०० वाजता प्रसारित होतात. येत्या शुक्रवारी या कार्यक्रमाचा शतकोत्सवी भाग सकाळी ७:०० वाजता आणि पुनर्प्रेक्षेपण शनिवारी सकाळी ६:०० वाजता प्रसारित होणार आहे.