Posts

Showing posts from February, 2013

रहस्यमय चित्रपट अशात एका बेटावर

मुंबई - जगप्रसिद्ध रहस्य कथाकार अगाथा ख्रिस्ती यांनी सुमारे ७0 वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'अँण्ड देन देअर वेअर नन'वर हा चित्रपट आधारलेला आहे. १९६७मध्ये याच कथेवर 'गुमनाम' हा गाजलेला सिनेमा आला. तो अजूनही रसिकांच्या मनात घर करून बसला आहे. त्यातील अभिनय, थरार, उत्कंठा, गाणीही हीट झाली आहेत. त्या चित्रपटाची तुलना या चित्रपटाशी करणे यथोचित ठरत नसले तरी, अनेक प्रसंग त्या हिंदी सिनेमाची आठवण करून देतात, हे नाकारता येत नाही. कारण, मराठी रसिकांनी हिंदी चित्रपटसृष्टीवरही जिवापाड प्रेम केले आहे, त्यातल्या चांगलेपणाचे कौतुकही केले आहे. हे सारे विसरून मराठी भाषेतला आजचा चित्रपट म्हणून 'अशाच एका बेटावर' या कलाकृतीकडे बघितले तर, रहस्यमयता कमावण्यात सिनेमा कुठेही कमी पडत नाही. निर्जन बेटावर गेलेले अंकुश चौधरी (आकाश), मधुरा वेलणकर (अमिता), संजय मोने (डॉ. विजय), मंगेश देसाई (साधू महाराज), शरद पोंक्षे (अँड. कामत), यतीन कार्येकर (जनार्दन), सई ताम्हणकर (शबनम), कमलेश सावंत (यशवंत) या आठही जणांची व्यवस्था करणारे दाम्पत्य सखाराम आणि कावेरी. अर्थात, संजय नार्वेकर आणि पूनम जाधव. या दहा