CBI म्हणते SSR Case ला AIIMS फॉरेंसिंक रिपोर्ट द्वारे नवी दिशा मिळेल

सीबीआयच्या टीमच्या मते क्राईम् सीन री क्रिएशन, फॉरेन्सिक रिपोर्ट, संबंधित पुरावे यांना पाहता हा मर्डर आहे असा कोणताच इशारा मिळत नाही. परंतु त्यांचा तपास अजून सुद्धा जारी असल्याचे त्यांनी सांगितले. या केस मध्ये मर्डरच्या दृष्टिकोनातून अजून कडक तपास केला जाईल.

सुशांतने १४ जूनला त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. मात्र सुशांत परिवार व त्याच्या चाहत्यांना ही आत्महत्या आहे असे मान्य नव्हते त्यामुळे सतत सीबीआयच्या तपासणीची मागणी केली जात होती. त्यानंतर सुशांतचे वडील केकेसी ह्यांनी पटना पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतचे पैसे लुटण्याचा व त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गंभीर आरोप लावला. त्यानंतर या केसने नवीन वळण घेतले.
आतापर्यंत रिया चक्रवर्ती ची मुंबई पोलीस व ईडीने अनेकदा चौकशी केली आहे. त्यानंतर आता गेले चार दिवस सलग सीबीआय तिची चौकशी करत आहे. आतापर्यंत जरी सीबीआयला या प्रकरणात मर्डर असल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नसला तरीही ते AIIMS फॉरेंसिंक रिपोर्ट ची वाट पाहत आहेत. या रिपोर्टमध्ये सुशांतचा पोस्टमार्टम आणि ऑटोप्सी रिपोर्ट्स आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA