PRO Ganesh Gargote's Sir - Marathi Film Industries ke Mama Ashok Saraf

अशोक सराफ!

सगळ्या इंडस्ट्रीचे मामा... मी मात्र नेहमी त्यांना ‘सर’ म्हणतो... २००४ साली त्यांची माझी ओळख झाल्यापासून आजतागायत ते कायम माझ्यासाठी 'सर'च राहिले... त्यांच्याबरोबर काम करायची खूप इच्छा होती. देवकृपेने २००५ साली च ती पूर्ण झाली. चित्रपट होता, 'नवरा माझा नवसाचा!' त्यानंतर आजतागायत आमच्या अनेक भेटी झाल्या. कधी शूटिंगच्या निमित्ताने... कधी चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने... कधी पुरस्कार सोहळ्यात...  तर कधी फिल्मी पार्ट्यांमध्ये... त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध जुळले. ते कायमच विनोदी ढंगात बोलायचे, अनुभव सांगायचे. त्यांचा चाहतावर्ग किती मोठा आहे ते तर मी प्रत्यक्ष बघतच होतो. त्या चाहत्यांचे काही किस्सेही ते आपल्या खुमासदार शैलीत सांगायचे. माझ्या मनात कायमच त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती असते. त्यामुळे मी आपण होऊन काहीच बोलत नाही कारण त्यात पण एक अतिशय लोभस नातं आहे.

त्यांच्या सगळ्याच भूमिका त्यांनी अविस्मरणीय केल्या. मला मात्र ‘पांडू हवालदार’, ‘सुशीला’, ‘खरा वारसदार', 'अशी ही बनवाबनवी', 'एक डाव भुताचा' यातल्या त्यांच्या भूमिका खूप आवडल्या. त्याविषयी त्यांच्याशी बोलावं असंही अनेकदा वाटलं पण धीर झाला नाही. २००४ ते २०२० या काळात अक्षरशः असंख्य वेळेला भेटूनही आमचा एकत्र असा एकही फोटो नव्हता. 'प्रवास' या त्यांच्या रिलीज होत असलेल्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आम्ही भेटत होतोच. परवा सुध्दा भेट झाली. त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी, बोलण्यासाठी चाहत्यांची, उपस्थितांची एकाच गर्दी झाली होती. मी नेहमीप्रमाणेच बाजूला उभं राहून शांतपणे बघत होतो. ती रांग संपली आणि एका अदृश्य ओढीने मी पुढे झालो. त्यांना म्हटलं, ‘सर.. मला तुमच्याबरोबर एक फोटो काढायचाय...!!! आजवर कधीच असं न म्हणणाऱ्या मी असं म्हटल्यावर ते आश्चर्यचकित झाले. म्हणाले, 'तुला.???’ मी म्हटलं, 'हो'. कारण तुमच्यासोबतचा  एकही फोटो माझ्याकडे नाही... ते म्हणाले, ''अरे... मग तर काढायलाच पाहिजे..!!''

तोच हा आमचा फोटो.. २००४ ते २०२० पर्यंतच्या आमच्या एकत्रित 'प्रवासा'चं वर्तुळ पूर्ण करणारी ही कॅमेराबद्ध आठवण!


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA