शिवजयंती मोठ्या उत्साहात ‘सरसेनापती हंबीरराव’च्या सेटवर साजरी

सह्याद्रीचा अभेद्य कडा, निसर्गाने आकाशी केलेली भगव्या रंगाची उधळण, फडकणारे भगवे ध्वज याबरोबरच  छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, सरसेनापती हंबीरराव मोहितेंचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा, कपाळी चंद्रकोर, डोक्यावर फेटा अश्या मावळ्यांच्या वेशातील कलाकार या उल्हासीत वातावरणात ‘सरसेनापती हंबीरराव’ या आगामी भव्य ऐतिहासीक  चित्रपटाच्या सेटवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

पाचगणी येथील टेबल लँड येथे संपन्न झालेल्या या अनोख्या शिवजयंती सोहळ्याला अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, डीओपी महेश लिमये, निर्माते संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांच्यासह चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ अशी संपूर्ण टीम उपस्थित होती. 

याप्रसंगी बोलताना ‘सरसेनापती हंबीरराव’चे लेखक - दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे म्हणाले, ‘महाराष्ट्रासाठी, भारतदेशासाठी सर्वात मोठा सण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. कोणत्याही माणसाने त्याच्या आयुष्यातील शुभकार्य शिवजयंतीच्या दिवशी सुरू केले तर ते नक्कीच पूर्णत्वास जाईल, कारण महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केले. या दैवी माणसाने आपल्यासाठी जे जे पाऊल उचलले ते यशस्वीच झाले आहे. काहीही झाले तरी चित्रपटाच्या सेटवर शिवजयंती साजरी झालीच पाहिजे ही आमच्या निर्मात्यांकडून आलेली संकल्पना आहे. आज ज्यांचे चित्रीकरण नव्हते असे कलाकार सुद्धा खास शिवजयंती साजरी करण्यासाठी सेटवर उपस्थित आहेत. आमच्या निर्मात्यांनी आज पुण्यात या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले याप्रसंगी हजारो लोक उपस्थित होते. सेटवर पावणे चारशेहून अधिक लोकांच्या युनिटने शिवरायांना मानाचा मुजरा केलेला आहे.’’ उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट जून २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA