सलमान खान ने ‘जाणिवा’ चा ट्रेलर रिलीज केला






एंजेल प्रोडक्शन चे अरविंद कुमार आणि ब्लू आय प्रोडक्शन मिलिंद विष्णु आणि र्शमन जैन निर्मित मराठी चित्रपट जाणिवा चा लांच इवेंट बांद्रा स्थित सोफिटेल होटल मध्ये संपन्न झाला. बॉलीवुड चे सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते चित्रपट जाणिवा चा ट्रेलर लांच करण्यात आला.

सलमान खान म्हणाले कि चित्रपट जाणिवा चा ट्रेलर मला फार आवडला आहे व ह्या चित्रपटात सत्या मांजरेकर ने दमदार भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ३१ जुलाई रोजी सूपंर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे. दर्शकांना हा चित्रपट नक्की पसंत पडेल.

ह्यावेळी मिडिया बरोबर कलाकारांना देखील आमंत्रित केले होते. उषा नाडकर्णी व रेणुका शहाणे सर्वात पहिल्या आल्या होत्या. त्यानंतर चित्रपटांतील नवोदित कलाकार संकेत अग्रवाल, सत्या मांजरेकर, वैभवी सांदिल्या, अनुराधा मुखर्जी और देवदत्त दाणी आले। सत्या चे वडिल महेश मांजरेकर हैदराबाद वरुन फक्त ह्या इवेंट साठी आले होते. त्याचबरोबर गिरीश वानखेड़े, सचिन पिळगांवकर, सचिन खेडेकर, एकता जैन, शरगुन, रवि आणि इतर कलाकार देखील चित्रपटाच्या ट्रेलर लांच साठी आले होते.

प्रसिद्ध दिग्दर्शक, कलाकार व निर्माते महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर ने मराठी जाणिवा मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे व हा चित्रपट ३१ जुलाई रोजी प्रदर्शित होत आहे. समाजातील कर्तव्याच्या जाणिवा असा या चित्रपटाचा विषय आहे. तरुणाईला भुरळ घालील असा हा चित्रपट आहे. यामध्ये समीर देशपांडे या तरुणाची भूमिका सत्या मांजरेकर ने साकारली आहे.

त्याचबरोबर सुप्रसिद्ध गायक दलेर मेहंदी ने मराठी चित्रपटासाठी पहिल्या वेळी एक गीत गायले आहे. गायक दलेर मेहंदी यांनी चित्रपट जाणिवा साठी धडाकेबाज गीत गायले आहे. 

चित्रपटातील कलाकार सत्या मांजरेकर, वैभवी सांदिल्या, अनुराधा मुखर्जी, देवदत्त दाणी, संकेत अग्रवाल, किरण करमरकर, अतुल परचुरे, रेणुका शहाणे, किशोर कदम, उषा नाडकर्णी व इतर आहेत. त्याचबरोबर खास भूमिकेत महेश मांजरेकर देखील आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA