युवा पिढीला प्रेरणा देणारा चित्रपट ‘जाणिवा’ - रेटींग * * * *




रेटींग * * * *
 
एंजेल प्रोडक्शन आणि ब्लू ऑय प्रोडक्शन चा मराठी चित्रपट जाणिवाचे निर्माता मिलिंद विष्णु, अरविंद कुमार, रेश्मा विष्णु आणि एक्टर सरमन जैन आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश रणशिंगे आहे. चित्रपट जाणिवा३१ जुलाई रोजी सर्वत्र रिलीज होत आहे. जेष्ठ अभिनेता महेश मांजरेकरचा मुलगा सत्या मांजरेकर ने मुख्य भूमिका साकारली आहे आणि नवोदित कलाकार वैभवी शांडिल्य, अनुराधा मुखर्जी, देवदत्त दानी, संकेत अग्रवाल व त्याचबरोबर किरण करमरकर, रेणुका शहाणे, अतुल परचुरे, इंदिरा कृष्णन, उषा नाडकर्णी, किशोर कदम आहे. खास भूमिकेत महेश मांजरेकर देखील आहेत.
एंजेल प्रोडक्शन आणि ब्लू ऑय प्रोडक्शन चा जाणिवाहे परिपू्र्ण उदाहरण आहे. आज कोणावर अन्याय झाला असेल, तर उद्या देखील दुस-याचे जीवन प्रभावित करु शकतो. 

जाणिवाची कथा एका तरुण संवेदनशील अशा अतिशय हुशार मुलाची आहे, ज्याला तरुण वयात न्याय व्यवस्थेबद्दल जाणिवनिर्माण होते. ह्या चित्रपटात सत्या मांजरेकर ने ह्याच तरुण मुलाची म्हणजेच समीर देशपांडे चा रोल साकारला आहे. संवेदनशील समीर कॉलेज चे आयुष्य मजेत आपल्या मिंत्राबरोबर घालवित असतो. त्याच बरोबर गु्प बैंड च्या साहाय्याने पैसे जमा करुन समाजिक कार्य देखील करत असतो. समीर व त्यांच्या मित्रांना जेव्हा आसावारी पाटील बद्दल घडलेली घटना समजते, तेव्हा समीरच्या जीवनात एक प्रकारचे चक्रीवादळ निर्माण होते. आसावारी पाटील ह्या युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी समीर एक असे पाउल उचलतो, ते पाउल कोणीही सहजा-सहजी उचलू शकत नाही किंवा त्याबद्दल विचार ही करु शकत नाही. समीर एकटाच आसावारी पाटील ला पूर्ण न्याय मिळवूव देण्याचा प्रयत्न करतो व त्यासाठी त्याला एक मर्डर देखील करावा लागतो व त्यानंतर सुरु होते कोर्ट-कचेरी मधील न्याय व्यवस्थेचा आगळा-वेगळा रोमांचित करणारा खेळ, जो दर्शकांना चित्रपट पाहण्यास भाग पाडतो, त्याचे कारण देखील वेगळेच आहे. 

ह्या चित्रपटांत सरकारी वकीलाची भूमिका किशोर कदम यांनी पार पाडली आहे तर समीरच्या वकीलाची भूमिका रेणुका शहाणे ने अतिशय खंभीर व सशक्त पणे पार पाडली आहे. 

जाणिवाच्या माध्यमातून युवा पिढीला प्रेरणा मिळणार आहे, तर आजचे तरुण प्रभावित होऊन नक्कीच त्यांच्या मधील जाणिवाजागृत होतील.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA