जेनरिक आधार मोबाईल ॲपचे लॉचिंग श्री रतन टाटांच्या हस्ते झाले














शंकर मराठे  - मुंबई, २४ मार्च २०२१:  मुंबई मध्ये नुकतेच १८ वर्षीय अर्जुन देशपांडेंच्या जेनरिक आधार कंपनी चे मोबाईल ॲप लॉनचींग खुद्द टाटा समूह चे अध्यक्ष श्री रतन टाटांच्या हस्ते झाले.

भारत: जेनरिक आधार ॲप रेटेलर्स व सामान्य जनते साठी लाभदायक...ॲप मध्ये अनेक फिचर्स आहेत ज्याने लोकांना जवळपास जेनरिक स्टोअर्स चे लोकेशन्स व नोटिफिकेशन्स मिळणार...जेनरिक आधार चा ॲप खूप सोपे व सुलभ आहे जे वृध्द सीनिअर सिटिझन्स साठी उपयोगी असेल....

मा. श्री. रतन टाटा सर यांनी १८ वर्षांचे युवा संस्थापक श्री. अर्जुन देशपांडे यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद व्यक्त केले. “अर्जुन देशपांडे यांनी जे काही साध्य केले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. आपण एक देश म्हणून आपल्या लोकांच्या आरोग्याबद्दल काळजी घेणे आवश्यक आहे. बर्‍याच वर्षांमध्ये आम्ही आमच्या लोकांच्या पिरॅमिडच्या शिखरावर पोहोचलो आहोत. हे चांगले आहे की आम्ही आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहोत, जेनेरिक आधारद्वारे आपण जेनेरिक औषधांच्या दिशेने जात आहोत हे चांगले आहे आणि जेनेरिक देशाच्या आरोग्याची क्षमता सुधारेल. जनतेला परवडणारी औषधे लोकांना परवडणारी वितरित करण्याची ही एक मोठी प्रगती आहे… लोकांसाठी उपलब्ध असणे ही कोणालाही किंमत नाही तर लोकांच्या हितासाठी आहे आणि मला आशा आहे की ही सेवा वर्षानुवर्षे वाढत जाईल, लोकांच्या सेवेच्या या आग्रहाने, लोकांना परवडणार्‍या किंमतीत आवश्यक गुणवत्तेची औषधे देण्याची जबाबदारी येते. आपला खरा उर्जा आणि आत्मविश्वास आपण लोकांच्या संख्येपर्यंत पोहोचला आणि त्यांच्या औषधाची काळजी घेतली. अशी इच्छा आहे की तुम्ही सर्व यशस्वी व्हाल आणि जनतेसाठी आणि लोकांद्वारे जेनेरिक आधारच्या वाढीसह भारतातील लोकांना फायदा होईल ” रतन टाटा अध्यक्ष टाटा समूह…

“देशातील गरीब रुग्णांना व सर्व सामान्यांना स्वस्तात औषधं उपलब्ध करून देणार युनीक आयडिया जेनरिक आधार “ भारतातील ६०% लोकांना आज औषधं परवडत नसल्यामुळे विकत घेता येत नाही पण ८५ ते ९०% औषधें ही भारतातच बनतात ज्यांना जेनरिक म्ह्टले जाते. त्यामुळे जेनरिक औषधे किमत कमी दरात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे...” अर्जुन देशपांडें उद्योजक जेनरिक आधार

रतन टाटा व अर्जुन देशपांडे यांची युनिक आयडिया मुंबईतून आज भारतभरात १००+ शहरात व गावात पोचली आहे...रतन टाटांसारख्या मोठ्या व्यक्तीने जेनेरिक आधार मध्ये आर्थिक तसेच नैतिक समर्थन केले. देशात सध्या करोना व्हायरस विरुद्धची लढाई सुरू आहे. जेनरिक कंपनीच्या माध्यमातून अर्जुनने एक मिशन हाती घेतले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि पेशनवर जगणाऱ्या लोकांना औषधे कमीत कमी किमतीत मिळावी. 

येत्या काही महिन्यात जेनरिक आधार चे केंद्र फक्त मुंबई - मुरबाड, पुणे, नागपूर, अमरावती, वर्धा, सांगली, मिरज, सातारा व इतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बुकिंग झाली आहे आणि लवकरच जेनरिक आधार चा लोकांना आधार मिळणार आहे.... महाराष्ट्राच्या व देशाच्या ग्रामीण शहरात ही सुरू करण्याचा ध्यास अर्जुन ने आपल्या हाती घेतला आहे....

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA