राहुल शर्मा ने सिनेमा एक्सरे, द इनर इमेज' मध्ये साइको लवरचा चैलेंजिंग रोल साकार केला आहे.

बॉलीवुड मध्ये सर्वात महत्वपूर्ण आहे प्रतिभा आणि दूसरे काही नाही. ह्यामुळेच देशाभरांतील काना-कोप-यातून तरुण सिनेमांत आपली स्वप्ने साकार करण्यासाठी मुंबईनगरीत येतात. राहुल शर्मा ने देखील असेच स्वप्न पाहिले. बिहार मधील एक लहानशे शहर मुज़फ़्फ़रपुरचा राहुलला १३ वर्षाचा असतानाच अभिनयांचे वेड लागले होते आणि आता तो मोठ्या पडद्यावर आपला पहिला सिनेमा 'एक्सरे, द इनर इमेज' घेऊन आला आहे. बाबा मोशन पिक्चर्स द्वारा निर्मित हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे राजीव रुइया ने. हा सिनेमा २९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

परंतु बिहार ते बॉलीवुड पर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. तो सांगतो कि मी हा प्रवास विसरू शकत नाही. मला आठवते कि मी १२ या १३ वर्षांचा असताना नृत्य स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली होती. मी नेहमीच अभिनय, थिएटर, संगीतात मनापासून रमत असे. मी म्युज़िक वीडियो मध्ये देखील काम करायला सुरुवात केली होती. मी मेडिकल चे शिक्षण घेणार होतो, परंतु मी मला कुठे-न-कुठे जाणवत होते कि मला एक अभिनेता बनायचे आहे, म्हणूनच मी डॉक्टरी चे शिक्षण घेतले नाही आणि आपल्या अभिनयाच्या वेडाला मनापासून जोपासाण्याचा निर्णय घेतला.
मुंबईत आल्यावर आपले अभिनय टैलेंट वाढविले आणि ऑडिशन देने सुरु केले. त्याचबरोबर बीएमएम मध्ये डिग्री प्राप्त केल्यानंतर एमटीवी, सेलिब्रिटी मैनेजमेंट फर्म मध्ये इंटर्नशिप करणे सुरु केले, मी विधुर चतुर्वेदी कडून एक्टिंग शिकली आहे. त्याचबरोबर मी डायरेक्टर राजीव रुइया साहेबांकडे गेलो आणि सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले, जेणेकरून सिनेमा निर्मिती मधील बारीक-सारीक गोष्टी समजू शकेल आणि शेवटी त्यांच्या सोबत पहिला सिनेमा केला.

राहुल कठोर परिश्रमांवर विश्वास ठेवतो – मला वाटते कि हार्डवर्कचे फळ कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिकच गोड असते. मला कैम-यासमोर काम करण्याचा प्रत्येक क्षण आवडतो.

चित्रपट एक्सरे मध्ये राहुल शर्मा व यशवी कपूर ची फ्रेश जोडी झळकत आहे. सिनेमांच्या म्यूजिक रिलीज साठी दिग्दर्शक अब्बास-मस्तान, शक्ति कपूर, पंकज बेरी, सुनील पाल, इवेलिन शर्मा, अदिति सिंग सोबत इतर पाहुणे आले. ट्रेलर व गाणी पाहून राहुलला शुभेच्छा दिल्या. राहुल ने तेथे यशवी कपूर, स्वाति शर्मा, अदिति शर्मा व इवेलिन शर्मा सोबत परफॉर्म देखील केला. टी सीरीज ने ह्या चित्रपटांचे संगीत रिलीज़ केले आहे, त्यातील गाणं जिगलिया एक मिलियन हून अधिक लोकांनी पाहिले आहे. बाबा मोशन पिक्चर्स द्वारा निर्मित हा सिनेमा २९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

ह्या सिनेमात राहुल ने साइको लवरचा रोल साकार केला आहे. आपल्या पहिल्या सिनेमात ग्रे कैरेक्टर साकार का केले ? ह्याबद्दल राहुल ने सांगितले कि ह्या सिनेमात माझा रोल एका साइको लवरचा आहे, जी मुलगी त्यांच्याकडे मदत मागायला येते, तिच्यावर प्रेम करु लागतो. आणि कोणत्याही परिस्थितित तिला मिळविण्याचा निर्णय घेतो. ह्यासाठी तो बरचं काही तोडतो. माझा रोल निगेटिव आहे कि पोसिटिव आहे या ग्रे शेड्सचा आहे... ह्यासाठी तुम्हांला सिनेमा बघायला पाहिेजे. पंरतु माझा रोल चैंलेजिंग आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA