कृष्णा अभिषेक व मुग्धा गोडसे यांचा कॉमेडी चित्रपट ‘शर्माजी की लग गई’ चा ट्रेलर लांच झाला.

रॉक माउंटेन प्रोडक्शंस चे नीलकंठ रेग्मी, वंशमणि शर्मा व ट्वीट एंटरटेनमेंट ने आपला पहिला सिनेमा ‘शर्माजी की लग गई’ चा ट्रेलर आणि पोस्टर लांच अंधेरी येथील व्यू सिनेमात आयोजित केला होता. निर्माता-दिग्दर्शक अनिल शर्मा व मेहुल कुमार खास करुन हा ट्रेलर लांच करण्यासाठी आले. सिनेमातील कलाकार कृष्णा अभिषेक, मुग्धा गोडसे, हेमंत पाण्डे, हिमानी शिवपुरी व ब्रिजेन्द्र काला देखील ह्या इवेंट साठी आले. पाहुण्यामध्ये सुनील पाल, नृत्य दिग्दर्शक लॉलीपॉप, विनय आनंद, कश्मीरा शाह, जितेन पुरोहित व आरती सिंग देखील आले. प्रवीण भारद्वाज ने चित्रपटांतील सर्व गाणी लिहिली आहे आणि संगीत देखील दिले आहे. मनोज शर्मा ह्या सिनेमांचे लेखक-दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट १५ मार्च रोजी रिलीज़ होणार आहे, ज्याचे संगीत ज़ी म्यूजिक कंपनी कडे आहे. ए के अरोड़ा व वत्सल बक्सी सहायक निर्माता आहे आणि कमल किशोर मिश्रा सह-निर्माता आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA