मराठी चित्रपटातील पहिली रेसलर महिला बनली तुप्ति भोईर


सध्या मराठी चित्रपटांत नव-नविन प्रयोग होत आहे व असाच आगळा-वेगळा प्रयोग अभिनेत्री तुप्ति भोईर ने मराठी चित्रपट अगडबम पार्ट – २ मध्ये केला आहे. ह्या चित्रपटांचे ६० टक्के चित्रिकरण पूर्ण झाले आहे व सध्या फिल्मसिटी मध्ये ह्या चित्रपटांचे शूटिंग जोरात सुरु आहे.

२०१० साली तुप्ति भोईर चा अगडबम रिलीज झाला होता व त्यानंतर आता ह्या चित्रपटांचा सिक्वेल घेऊन येत आहे. ह्या चित्रपटांविषयी तुप्ति भोईर बरोबर बॉलीवुड मार्केट चे संपादक शंकर मराठे यांनी चर्चा केली.

० चित्रपट अगडबम पार्ट – २ मधून दर्शकांना नविन काय बघावयास मिळणार आहे ?
-- चित्रपटांची कथा तशी कौटंबिक आहे. रायबा व नाजूकांच्या लग्नांना ६ वर्ष झाली आहेत व त्यांना अजून काही मुल-बाळ झालेल नाही, ही मोठी खंत आहे व त्यामुळे घरातील वातावरण जरासे निरागस आहे, परंतु ह्यामधून नाजूकांच्या आयुष्यात अस काही तरी आगळ-वेगळं घडतं की तिचे सपूंर्ण आयुष्यच बदलून जाते व ते आगळं-वेगळं घडताना नाजूका कोण-कोणत्या संकटातून जाते व कशा प्रकारे येणा-या संकाटाला सामोरे जाते, हेच ह्या चित्रपटाची खासियत आहे.

० ह्या चित्रपटांचा बजट देखील सिनेमाच्या नावाप्रमाणेच अगडबम आहे....
-- माझा प्रत्येक चित्रपट वेगळ्या स्टाइलचा व हटके असतो. टूरिंग टॉकिजअगडबम ह्या दोन सिनेमांची निर्मिती केल्यानंतर मी बरच काही शिकले आहे. ह्या चित्रपटांत मी नाजूकाची मुख्य भूमिका साकारत आहे व त्याबरोबर डायरेक्शन देखील करत आहे. चित्रपटांची कथा माझी आहे व मीच प्रोड्यूसर आहे. ह्या चार ही गोष्टी संभाळत असल्यामुळेच चित्रपटांची बजट अगडबम झाला होता. परंतु काही लोकांनी मला अशी काही मदत केली की त्यामुळे माझा अर्धा बजट कमी झाला आहे व मी ह्या चित्रपटांची निर्मिती हॉलीवुडपटा सारखी करु शकले.

० नाजूका चा रोल पुन्हा एक वेळ साकारताना काय अनुभव आला ?
-- नाजूका चे कैरेक्टर लट्ठ-गट्ठ असल्यामुळे मला सेट वर जाडजूड पोशाखात रहावे लागते व त्यामुळे मला फार त्रास होतो. एवढंच काय तर माझ्या शरीरारा मोठ-मोठे फोड देखील आले होते, परंतु शूटिंग थांबू नये, ह्यासाठी मी स्वतः बैडेड लावून शूटिंग केले आहे. ह्या चित्रपटांतून दर्शकांना नाजूकाचे नवीन रुप पहावयास मिळणार आहे.

० मराठी चित्रपटातील पहिली रेसलर महिला तुप्ति भोईर बनली आहे....
-- मराठी चित्रपटांत असा प्रयोग कोणी ही केला नव्हता, कारण अशा स्टाइलचा चित्रपट बनविताना फार खर्च येतो व चित्रिकरणासाठी सिनेमाचा बजटच डबल होतो, परंतु मी माझ्या बजट मध्येच सर्व काही मैनेज केले आहे. साउथ चे फाइट मास्टर आहेत व त्यांनी खास ट्रेनिंग देऊन चांगले काम करुन घेतले आहे. मी रेसलर म्हणजेच कुस्ती करणारी पहलवान बनली आहे, जी विदेशी पहलवानांबरोबर चक्क दोन-दोन हात करते. हे ह्या चित्रपटांची खासियत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA