हिंदी चित्रपट ‘ब्लू माऊंटन्स’ ला १९ व्या अंतरराष्ट्रीय बाल फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वश्रेष्ठ फिल्म पुरस्कार मिळाला



हैदराबाद मध्ये नुकताच १९ वा अंतरराष्ट्रीय बाल फिल्म फेस्टिवल संपन्न झाला व त्यामध्ये क्रिश मूवीज चे निर्माता राजेश कुमार जैन यांचा पहिला चित्रपट ब्लू माऊंटन्स ला सर्वश्रेष्ठ फिल्म चा पुरस्कार मिळाला. ह्या चित्रपटाचे फार कौतुक करण्यात आले आहे. ह्या प्रतिष्ठित फिल्म समारंभात चित्रपट ब्लू माऊंटन्स चे स्क्रिनिंग सुरु असताना टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले. ह्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक सुमन गांगुली म्हणाले कि ब्लू माऊंटन्स तर बदलत्या रंगा प्रमाणे आहे, जसे ऋतु बदलतात. चित्रपटात मानवाच्या भावना आणि प्रवासा मधील हारणे व जिंकण्याचे जीवन दाखविण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न केला गेला आहे.

हा पुरस्कार जिंकल्यानंतर श्री राजेश जैन म्हणाले कि चित्रपट ब्लू माऊंटन्स ला हा एक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे, त्यामुळे आम्हांला स्फूर्ति मिळाली आहे. ह्या चित्रपटात मुलांचे आई-वडिल आणि कौटुंबिक मूल्यांवर जास्त जोर देण्यात आला आहे. मी ज्यूरी सदस्यांचे आभार मानतो, त्यांच्यामुळे आमचे प्रयत्न दर्शकांपर्यत पोहचविण्यास मदत मिळाली. त्याच बरोबर सर्व टीम मेंबर्स चे कौतुक करतो कि त्यांचे कठिन परिश्रम व मेहनतीमुळेच चांगला चित्रपट बनला, त्यामुळेच हा सन्मान प्राप्त झाला आहे.

चित्रपट ब्लू माऊंटन्स मध्ये मानवीय भावनांची कथा मांडण्यात आली आहे, त्यामध्ये सुख-दु:ख आहे, तर जिंकणे-हारण्याची कथे बरोबर लहानपणाच्या आठवणी देखील आहे. जीवनाचे वास्तविक दर्शन आहे, पुन्हा लढण्याची प्रेरणा मिळते, तर सूर्याच्या पहिल्या किरणामुळे उत्तेजना मिळते. त्यामुळेच पुन्हा लढण्याची शिकवण देखील मिळते. प्रत्येक माणसाचे एक स्वप्न असते आणि माणसाला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. ब्लू माऊंटन्स मध्ये एका तरुण मुलाला आपल्या स्वप्नापर्यंत पोहचण्यास मदत मिळते. चित्रपटातील मुख्य कलाकार ग्रेसी सिंह, रणवीर शोरे, यर्थाथ रतनम आणि राजपाल यादव. चित्रपटात शान, श्रेया घोषाल आणि सुनिधि चौहान ने गाणी गायली आहे.


क्रिश मूवीज बद्दल :
क्रिश मूवीज मध्ये कलात्मक कामाचा सम्मान केला जातो. आमच्या मते सिनेमा साठी तीन शब्द महत्वाचे आहे – चिकाटी, प्रेम आणि चिकाटी. ही कंपनी कलात्मक कामाला प्रोत्साहित करते. क्रिश मूवीज चे श्री राजेश जैन, हैण्डी क्राफ्ट चे एक्सपोर्टर आहेत आणि सिनेमा प्रेमी आहेत. सह-निर्माता च्या रुपात त्यांचा हा पहिला सिनेमा आहे. ह्या चित्रपटाला अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ब्लू माऊंटन्स नंतर दुस-या प्रोजेक्ट मध्ये एका गायकाच्या संघर्षाची गाथा दाखविणार आहे. हा आमचा दुसरा प्रोजेक्ट आहे, ज्याचे निर्माण क्रिश मूवीज च्या बैनर खाली होणार आहे. त्याचबरोबर क्रिश मूवीज चित्रपट ब्लू माऊंटन्स नंतर भविष्यात चित्रपट आणि डाक्यूमेंटसीज वर काम करणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA