साहित्य सत्कार समारंभात आचार्य विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी द्वारा लिखित ३०० वे पुस्तकाचे लोकार्पण



साहित्य सत्कार समारंभात आचार्य विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी द्वारा लिखित ३०० वे पुस्तक 'मारूं भारत, सारूं भारत' चा लोकार्पण समारंभ १० जानेवारी, २०१६ रोजी मुंबई च्या सायन स्थित सोमैया ग्राऊन्ड येथे होणार आहे.  परम पूज्य आचार्य विजय रत्नसुंदरसुरी हे कोणत्याही परिचयाचे मोहताज नाही आहे. ते ही-या-मोत्या प्रमाणे मनमोहक आणि मनुष्याची सुंदरता व आकर्षणशीलताच्या रुपात भारत देशातील महान जैन संत आहे. त्यांनी आतापर्यंत विदेशी यात्रा केली नाही, तरी देखील त्यांचे विचार आणि अनुयाई संपूर्ण जगात आहेत, ज्यांची कोणतीही भौगोलिक मर्यादा नाही आहे.
वाणीची प्रभावकता, साहित्याची सृजनात्मकता एवं प्रकृतिच्या सरळतेचा त्रिवेणी संगम अर्थात राष्ट्रहितचिंतक, पूज्यपाद, जैनाचार्य श्रीमद्विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी महाराज चे मूळ नाव रजनी होते, त्यांचा जन्म ५ जानेवारी १९४८ मध्ये गुजरात च्या देपला गावात झाला. वडिल दलीचंदभाई व आई चंपाबेन च्या सुसंस्कारोंच्या रुपात रजनी ने १९ वर्षात जैन धर्माचा दीक्षा घेऊन मुनि रत्नसुंदरविजय बनले. तेव्हा पासून आजपर्यंत ४५ वर्षात आपल्या वाणी आणि लेखनीच्या माध्यमातून आचार्यश्री यांनी लाखों लोकांची मने मन-जीवन व कौटुंबिक व्यवहारांनी जिंकली आहे. आचार्यश्री नी आतापर्यंत २९९ पुस्तकें लिहीली आहे, त्यातील काही पुस्तकें ९ भाषेत देखील प्रकाशित झाली आहे. कम्प्यूटर-इंटरनेट च्या आधुनिक युगात देखील आचार्यश्री च्या साहित्यला पाठकांचा सुंदर प्रतिसाद प्राप्त झाला आहे.  त्यांना सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स' देखील मिळाला आहे. त्यांची काही पुस्तकें इंग्रजी, हिंदी, मराठी, सिंधी, उर्दू, फ्रेंच इत्यादी भाषेत अनुवादित केली आहेत व संपूर्ण देशात ६ मिलियन पेक्षा जास्त पुस्तकें वितरीत केली आहे. त्यांचे शब्द राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर अरिहंत टीवी, पारस टीवी व सोहम टीवी च्या माध्यमातुन ऐकले जातात. काही लोकांना त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून जीवनात लाभ मिळाला आहे.
दिल्ली मध्ये आचार्यश्री यांचे चार वर्ष वास्तव्य होते व त्यावेळी त्यांच्या भेटी सत्तेत असलेले नेते मंडळी आणि अन्य पार्टीच्या नेते मंडळी बरोबर होतात आणि त्यांनी शांती पसरविण्याचा संदेशा बरोबर राष्ट्र आणि समाजाच्या हिता साठी मार्गदर्शन केले आहे. गुरु महाराजांच्या मते, लोक फरक करु शकतात, जेव्हा त्यांना योग्य दिशा व योग्य रस्ता दाखविला जाईल.
साहित्य सत्कार समारंभात अनेक प्रकारचे आकर्षण आहे आणि हा समारंभ १ जानेवारी ते १० जानेवारी २०१६ पर्यंत होणार आहे. ह्या १० दिवसांच्या कार्यक्रमात अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहे. फिल्म झोन – जीवन यात्रा, फ्लाय झोन – साहित्य यात्रा, फन झोन – आनंद यात्रा, फ्लेम झोन – परिवर्तन यात्रा सारखे काही यात्राचे  दर्शन ह्या समारंभात होणार आहे. रजवाडी नक्शीकामाने सजलेला उत्तम कलाकृति केलेला ४०० फुट लांब व ६० फुट उंच असे भव्यातिभव्य प्रवेशद्वार आह, त्यामध्ये शंखेश्वर तीर्थस्थान आहे. विशाल प्रवचन मंडप, मां सरस्वती मंदिर, साधु-साध्वीजी साठी कुटिर आणि सर्व पाहुण्यांसाठी भोजन व्यवस्थेसाठी विशाल भोजन मंडप उभारला आहे.
१० जनवरी, २०१६ रोजी सकाळी ९ वाजता आचार्य विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी द्वारा लिखित ३०० वे पुस्तक 'मारूं भारत, सारूं भारत' चा लोकार्पण समारंभ होणार आहे. हे पुस्तक हिंदी, गुजराती, मराठी व इंग्रजी भाषेत आहे. साहित्यसृजन च्या इतिहासा मधाली हे सोनेरी पान आहे. ह्या समारंभा साठी लाखोंच्या संख्येत भक्तगण उपस्थित राहणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA