खासदार कपिल पाटिल च्या दही हंडी साठी चित्रपट व टीवी इंडस्ट्रीचे कलाकार भिवंडी मध्ये आले

खासदार कपिल पाटिल मागील दहा वर्षापासून सोशल इवेंट चे आयोजन करत आले आहेत. ह्या वर्षी भिवंडी स्थित शिवाजी चौक येथे भव्य आणि दिव्य दही हंडी चे आयोजन केले होते व बक्षिसाची रक्कम ३३ लाख रुपए ठेवली होती. ह्या इवेंट मध्ये सर्वात पहिले दिपक बलराज विज आणि किशोरी शहाणे आले. त्यानंतर गायिका शबाब साबरी, टीना घई, संचिति सकट आणि तारिका भाटिया ने दर्शकांना भरपूर नाचविले. कलाकारां मध्ये जरीन खान, दिव्यांका त्रिपाठी, एकता जैन, परीक्षित साहनी, अमृता खानविलकर सुद्धा आली होती. कृतिका गायकवाड आणि दिग्दर्शक मुन्नवर भगत यांनी हिंदी चित्रपट लाखों हैं यहां दिलवाले चे जोरदार प्रमोशन केले. ह्या चित्रपटात ११ जुनी सुपरहिट गाणी आहेत व त्यामुळेच हा चित्रपट दर्शकांना फार आवडला आहे.

अभिनेत्री किशोरी शहाणे ने सर्व भिवंडी वासियांचे जोरदार स्वागत केले. किशोरी म्हणाली कि दही हंडी चा उत्सव म्हणजे खराखुरा मराठमोळा मस्तीचा व जल्लोषाचा सण आहे. लहान मुलांपासून ते वयोवुद्ध देखील हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात.
गायिका शबाब साबरी, तारिका भाटिया, संचिति सकट व एकता जैन ने दही हंडी पाहण्यासाठी आलेल्या दर्शकांचे गाणी गाऊन मनोरंजन केले. त्याचबरोबर अभिनेत्री जरीन खान, दिव्यांका त्रिपाठी व अभिनेता परीक्षित साहनी ने देखील दही हंडी सणाचे महत्व व मराठमोळ्या परंपरे बद्दल सांगितले व प्रेक्षकांचे जल्लोषाने स्वागत केले, त्यामुळेच रात्री १० वाजे पर्यंत दर्शकांची गर्दी वाढतच चालली होती.
आता वाजले की १२ फेम अभिनेत्री अमृता खानविलकर ने एकदम जल्लोषात भिवंडी वासियांचे भरभरून स्वागत केले व एक जबरदस्त डांस नंबर सादर केला. दर्शकांना अमृता चे नृत्य फारच आवडले व त्यांनी वन्स-मोरचा तडका देखील लावला होता.
नुकताच प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट लाखों हैं यहां दिलवाले चे दिग्दर्शक मुन्नवर भगत सोबत अभिनेत्री कृतिका गायकवाड ने दही हंडी च्या उत्सवात येऊन आपल्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले व कृतिका ने आपल्या नृत्यांचा जलवा देखील दाखविला.
नगरसेवक सुमित पाटिल यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांना ट्रॉफी व शाल देऊन स्वागत करण्यात आले. सुमित पाटिल यांनी सांगितले कि दही हंडी चा मस्तीभरा सोहळा मागील दहा वर्षापासून साजरा होत आहे, परंतु ह्यावेळी हा उत्सव धडाकेबाज करण्यात आला आहे. मराठमोळी संस्कृतिचे जतन करणे हाच एकमेव सामाजिक उद्देश्य आहे. एवढंच काय तर दही हंडी उत्सवातून आमच्या मंडळाने दुष्काळग्रस्त राज्यासाठी निधी जमा केला आहे व तो निधी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना देणार आहे. दही हंडी च्या शानदार इवेंटचे संचालन हाईटेक इवेंट्स चे जिग्नेश बूटा यांनी केले आहे. सात थरांची दही हंडी पाहण्यासाठी २०,००० हून जास्त माणसे भिवंडी मध्ये जमा झाली होती व रात्री १० वाजायला एक मिनिट कमी असताना दही हंडी फोडण्यात गोविंदा पथकांना यश प्राप्त झाले. एका गोविंदा पथकाला दही हंडी फोडणे शक्य नव्हते व  वेळेचे बंधन असल्यामुळे दोन गोविंदा पथकाने एकत्र येऊन दही हंडी फोडली व दोन्ही मंडळाला बक्षिकांची रक्कम समान रुपात वाटण्यात आली व एक भव्य-दिव्य ट्रॉफी देखील देण्यात आली.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA