भाऊ कदमचा Acting प्रवास

भाऊ कदम म्हणजे भालचंद्र कदम दिसायला तसा सावळा अंगाने सुद्धा तसा बेढब कोणाच्याही नजरेत पहिल्याच क्षणी भरणार नाही असा पण त्याचा आतापर्यंतचा प्रवास म्हणजे एक नवलच, आपल्या अभिनयाने लोकांना हसवणारा हा अभिनेता आता तर घराघरात पोचला आहे. त्याच्या प्रत्येक विनोदाला खळखळून हसणारा प्रेक्षक तुम्ही पाहिलाच असेल. भाऊ चा जन्म 1972 साली मुंबई मध्ये झाला. त्यांचे वडील भारत पेट्रोलियम या कंपनीमध्ये काम करत होते.

वडाळा येथील प्राथमिक शाळेतून त्यांनी आपले शिक्षण घेतले. आपले वडील गेल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी भाऊंवर आली. त्यानंतर त्यांनी आपले सगळे लक्ष आपल्या कामावर केले. आपल्या कामाला देव मानले. याने रंगभूमी ते छोट्या पडद्या पासून अगदी मोठ्यापर्यंत आपली कारकीर्द सुरू केली. वेगवेगळी नाटके केली त्यातून लोकांना हसवले. त्याने अनेक एकांकिका मधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. दोन अंकी एका नाटकाने त्याला एक पारितोषिक मिळवून दिले ते महाराष्ट्र शासनाकडून आणि या नंतर भाऊ कदम थांबला नाही आणि आणखी पुढे जाण्याची शपथ त्याने स्वतःशीच घेतली.

त्यानंतर हळू हळू त्याने एवढंच ना आणि एक डाव भटाचा यांसारखे विनोदी नाटके केले आणि त्यानंतर तो एक अस्सल विनोदी अभिनेता म्हणून लोक त्याला ओळखू लागली . फू बाई फू हा मराठी कार्यक्रम झी मराठी वर आला शिवाय या कार्यक्रमात भाऊ कदम यांची ही निवड झाली. पहिल्यांदा कॅमेरासमोर काम करायची भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी त्यासाठी नकार दिला होता पण नंतर त्यांच्या मुलीच्या प्रेमा खातर त्यांनी यामध्ये काम करण्यासाठी होकार दिला. कार्यक्रमातून भाऊ कदम यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केले.

या कार्यक्रमात निलेश साबळे ही होता त्याने नंतर भाऊ, कुशल बद्रिके आणि इतर कलाकारांना सोबत घेऊन काहीतरी नवीन करायचे ठरविले आणि “चला हवा येऊ द्या” या कार्यक्रमाची सुरूवात केली. यातील भाऊचे कॅरेक्टर हे समोर आल्यावरच लोकांना हसु नाही शकणार असे होणार नाही. त्याची स्वत:ची हसवण्याची शैली लोकांना अजूनही आवडते आहे. या कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तीची भूमिका अगदी चोखपणे बजावणारा हा अभिनेता आता लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत सगळ्यांचा चाहता झाला आहे. त्यांनी तुझं माझं जमेना या मालिकेमध्ये ही एक भूमिका साकारली आहे.

शिवाय अनेक चित्रपटांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. हरीशचंद्राची फॅक्टरी, सांगतोय काय, आम्ही बोलतो मराठी, एक कटिंग चाय, पुणे वाया बिहार, चांदी, कुटुंब, फक्त लढ म्हणा, मस्त चाललंय आमचं, नारबाची वाडी, कोकणस्थ, टाईम पास, टाईम पास 2, बाळकडू आणि जाऊ द्या ना बाळासाहेब इतर मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट म्हणजे फेरारी की सवारी या यामधून ही भाऊ आपल्याला दिसला. मराठी मध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांत भाऊ असायलाच पाहिजे तर कॉमेडी पूर्णत्वाला गेल्यासारखी वाटते आणि म्हणून होणाऱ्या प्रत्येक अवार्ड शो मध्ये भाऊ च्या बतावण्या ऐकुन प्रेक्षक ही पोट धरून हसताना आपल्याला दिसतात.

शूटिंगच्या वेळापत्रकामुळे भाऊला आपल्या कुटुंबाला फारसा वेळ द्यायला मिळत नाही. पण शूटिंग नसताना तो कुटुंबीयांसोबत निवांत क्षण आवर्जून घालवतो. भाऊ व ममता यांच्या सुखी संसारात त्यांच्या तीन मुलीही आहेत. मृण्मयी, संचिती आणि समृद्धी अशी भाऊच्या लाडक्या लेकींची नावं आहेत. असा हा भाऊ कदम यांच्या कॉमेडी शिवाय आपलं हसणं म्हणजे वाया गेल्यासारखे वाटते.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA