एड फिल्ममेकर लॉयड बापिस्टा कमल हासन – श्रीदेवी चा चित्रपट ‘सदमा’ चा रिमेक बनविणार


सध्या बॉलीवुड़ मध्ये रुपांतरीत अप्रत्याशित रीमेक स्टोरीज वर चित्रपट बनविण्याचा सुवर्णकाळ सुरु आहे व ह्यामध्ये कमल हासन आणि श्रीदेवी चा चित्रपट सदमा चा नंबर आला आहे. तुम्ही अप्रत्याशित का विचारात आहात ? सुप्रसिद्ध एड फिल्ममेकर लॉयड बापिस्टा आता दिग्दर्शक बनायला चालले आहे. त्यांनी ११ वर्षापूर्वी हा चित्रपट बनविण्याचा विचार केला होता. मला हा हॉलीवुड चित्रपटा सारखा बनवायचा आहे, त्यावेळी मी न्यूजीलैंड मध्ये होतो. परंतु त्यावेळी हॉलीवुड स्टूडियो मध्ये रिमेक चित्रपट बनविण्याच्या प्रक्रिये मध्ये तेवढी गति नव्हती. आता काळ बदलला आहे, दर्शक देखील बदलला आहे आणि आता मी शंभर टक्के हा चित्रपट बनवून अद्धभूत काम करण्यास सज्ज झालो आहे.
लॉयड बापिस्टा फक्त हिंदी चित्रपट इंडस्ट्री मध्ये नवीन नाव असेल, परंतु जाहिरातीच्या दुनियेत मोठ-मोठ्या दिग्दर्शकांच्या लिस्ट मध्ये नाव येते. शाहरुख खान, अनुष्का शर्मा, रितिक रोशन, करीना कपूर,  जॉन अब्राहम, शाहिद कपूर, प्रियंका चोपड़ा, अर्जुन कपूर, रणवीर सिंह, अर्जुन रामपाल सारख्या कित्येक कलाकारांसाठी कित्येक एड फिल्म शूट केल्या आहेत. लॉयड ने ठरविले आहे कि आता चित्रपट बनविण्याची योग्य वेळ आली आहे. मागील सात-आठ वर्षांच्या कालावधी मध्ये काही एड फिल्म चे दिग्दर्शन केले आहे. मला वाटते कि फक्त एड फिल्ममेकर हे नाव पुरेसे नाही आहे, कारण यापूर्वी मी एक संपादक देखील होतो आणि आता मी एक पाऊल पुढे टाकण्याचा विचार केला आहे. राज कुमार हिरानी किवां डेविड धवन चे उदाहरण तुम्ही घेऊ सकता, लॉयड सांगतात.
आता सदमा चा रिमेक बनवून पहिला चित्रपट बनविण्याची इच्छा आहे. लॉयड हा चित्रपट बनवून पुन्हा एक वेळ इतिहासाची पुनरावृत्ती करणार आहे आणि ह्यामध्ये
कोणत्याही प्रकारची कमी पडू देणार नाही. मी हा चित्रपट बनविण्याचा विचार मागील ११ वर्षापासून करत आहे. मला माहित नव्हते कि ह्या चित्रपटांचे राइट्स कोणाकडून घ्यायचे आहे. परंतु मला जेव्हा समजले कि राज सिप्पी यांच्याकडे राइट्स आहेत, तेव्हा मी त्यांची भेट घेतली. मी त्यांना भेटून आश्चर्यचकित झालो, कारण त्यांनी मला ह्या प्रोसेस बद्दल एकदम सोप्या पद्धतीने सांगितले. आता माझ्याकडे चित्रपटांचे राइट्स आहेत. मला मागे वळून बघण्याची आवश्यकता नाही आहे,  लॉयड ने सांगितले.
ह्या चित्रपटांतील मुख्य भूमिका साकारण्यासाठी बॉलीवुड मधील मोठ-मोठ्या कलाकारांच्या नावां बद्दल विचार करत आहे. कैरेक्टला साजेसे असे कास्टिंग करण्याबद्दल अध्ययन करत आहे. जेव्हा कलाकारांची निवड प्रक्रिया पूर्ण होईल, तेव्हा आधिकारिक रूपाने चित्रपटांची घोषणा केली जाईल. लॉयड पुढे सांगतात कि कमल हासन – श्रीदेवी सारख्या कलाकारांसारखे कलाकार निवडणे हे एक आव्हान आहे. आम्ही प्रत्येक स्तरांवर काम करत आहे. सदमा च्या रिमेक स्क्रिप्ट वर डॉक्टर जूही चतुर्वेदी काम करत आहे आणि एका आधुनिक युगाची कथा बनविण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरु आहे. मुकेश छाबड़ा कलाकारांच्या निवड प्रक्रिये मध्ये मदत करत आहे. सर्व कामे पूर्ण झाल्यावरच आम्ही चित्रपट फ्लोर वर घेऊन येणार आहे.
तर, आम्हांला फक्त सदमा चा रिेमेक बनवून सोनेरी इतिहास घडवायचा आहे, हा अद्धभूत चमत्कार पाहण्यासाठी तुम्ही वाट पाहू शकता का ?

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA